पुणे : हिंदु राष्ट्र स्थापनेत येणारी विघ्ने दूर व्हावीत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घारोग्य लाभावे, यासाठी रामनवमीच्या दिवशी म्हणजे १३ एप्रिलला केडगाव (ता. दौंड) येथील श्रीराममंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचारमंचचे डॉ. नीलेश लोणकर यांनी सपत्नीक साकडे घातले. या प्रसंगी राहू येथील कैलास कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश देशमुख, तसेच सनातन संस्थेचे साधक आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
वडगाव काशींबेग (ता. आंबेगाव) येथील श्रीराममंदिरात रामरायाला साकडे घालण्यात आले. या प्रसंगी ह.भ.प. शशिकांत महाराज कडधेकर, अधिवक्ता नवनाथ निघोट, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलीप शेटे आणि अन्य साधक, भाविक असे ४० जण उपस्थित होते. हडपसर येथील सियाराम मंदिर, शिरवळ (जिल्हा सातारा) येथील श्रीराम मंदिर, खंडोबाची वाडी गावातील मारुति मंदिर, तळेगाव येथील श्रीराम मंदिर या ठिकाणीही साकडे घालून प्रार्थना करण्यात आली.