दुधातील भेसळ रोखण्याची आणि अश्लील संकेतस्थळांवर बंदी घालण्याची मागणी
मुडबिद्री (कर्नाटक) : दुधात मिसळण्यात येणारे हानीकारक पदार्थ रोखण्यात यावे, अश्लील संकेतस्थळांवर बंदी घालण्यात यावी, गाडीत पेट्रोल भरतांना पारदर्शक पाईपचा वापर करणे इत्यादी मागण्या करणारे एक निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी नुकतेच मुडबिद्री तहसीलदारांना दिले. या वेळी सनातन संस्थेचे श्री. गोपाळकृष्ण मल्या, सौ. शोभा आणि सौ. जान्हवी पै उपस्थित होत्या.
प्राणी कल्याण मंडळाचे सदस्य श्री. मोहन सिंग अहलुवालिया यांच्या अहवालानुसार दुधामध्ये ‘डिटर्जंट पावडर’, ‘कॉस्टिक सोडा’, ‘ग्लुकोज’ आणि पांढरा रंग मिसळला जातो. तसेच दुधामध्ये तेलही मिसळले जाते. अशा भेसळयुक्त दुधामुळे लहान मुलांची वाढ खुंटते. तसेच त्यांच्या आरोग्यावरही त्याचा विपरित परिणाम होतो, असे या अहवालात म्हटले आहे. या अहवालाच्या आधारे तहसीलदारांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.