पौराधार (अनुपपूर, मध्यप्रदेश) : येथे संस्कार मंचच्या वतीने श्री श्री १०८ शतचंडी यज्ञ आणि संगीतमय रामकथा यांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. श्रीराम काणे यांनी ‘आचारधर्म’ या विषयावर व्याख्यान घेऊन प्रबोधन केले. १०० हून अधिक जिज्ञासूंनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.
क्षणचित्रे
- कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. अनेक जिज्ञासूंनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
- सनातनच्या ग्रंथांविषयी अनेक धर्मप्रेमींनी सांगितले की, सध्याच्या स्थितीत हिंदूंना अशा ग्रंथांची आवश्यकता आहे.
गावातील लोकांना धर्मशिक्षण मिळण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे श्री. अरविंद परिहार !
प्रयाग येथील कुंभमेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाला श्री. अरविंद परिहार आणि श्री. ओमप्रकाश यांनी भेट दिली होती. त्यांनी तेथेच निश्चय केला होता, ‘हे धर्मशिक्षणाविषयीचे प्रदर्शन आपल्याला आपल्या गावापर्यंत पोचवले पाहिजे.’ या दोघांच्या प्रयत्नांमुळे हे प्रदर्शन पौराधार (अनुपपूर) येथे आयोजित करण्यात आले होते. या वेळी प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री. अरविंद परिहार म्हणाले, ‘‘लोकांना हे धर्मशिक्षण मिळणे आवश्यक आहे. पुढच्या वेळी अधिक कालावधीसाठी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करू.’’