Menu Close

जमशेदपूर येथे ‘हिंदु नववर्ष स्वागतयात्रे’त हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

सनातन-निर्मित छत्र्या हातात घेऊन स्वागतयात्रेत सहभागी झालेले हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

जमशेदपूर : येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात नुकतीच हिंदु नववर्षानिमित्त हिंदु उत्सव समिती आणि इतर हिंदु संघटना यांच्या वतीने ‘हिंदु नववर्ष स्वागतयात्रा’ काढण्यात आली होती. या यात्रेमध्ये हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक यांनीही सहभाग घेतला होता. गेल्या ३ वर्षांपासून ही यात्रा काढली जाते. या यात्रेत लाखोंच्या संख्येने हिंदू सहभागी होऊन नववर्षाचे स्वागत करतात. या वर्षी ४ लाखांहून अधिक हिंदू सहभागी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

क्षणचित्रे

  • हिंदु जनजागृती समितीच्या पथकामधील कार्यकर्त्यांनी सनातन-निर्मित छत्र्या हातात घेतल्या होत्या. त्यामुळे हे पथक सर्वांचे लक्ष आकर्षित करत होते.
  • रस्त्याच्या बाजूला उभे असलेले काही जण उत्स्फूर्तपणे समितीच्या पथकात सहभागी होत होते आणि समितीविषयी जाणून घेत होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *