मुंबई : हिंदु राष्ट्र स्थापनेत येणार्या अडचणी दूर होऊन सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घारोग्य लाभावे, यासाठी हनुमान जयंतीच्या निमित्ताने १९ एप्रिल या दिवशी विक्रोळी (पूर्व) येथील हनुमान मंदिरांत हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी तसेच धर्मप्रेमींनी साकडे घातले. सार्वजनिक श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, टागोरनगर येथे मंदिराचे विश्वस्त श्री. प्रभाकर माने, सर्वश्री भारत बागवे, प्रदीप तावडे, जनार्दन पवार, बाबासाहेब घोंगडे, प्रभाकर भोसले आणि वीणाधारक विपुल दळवी यांसह २५ धर्मप्रेमींनी साकडे घातले.
स्वयंभू हनुमान मंदिर ट्रस्ट येथे साकडे घालतांना धर्मप्रेमी
तसेच स्वयंभू हनुमान मंदिर ट्रस्ट, कन्नमवारनगर २ येथे साकडे घालतांना मंदिराचे अध्यक्ष शिवराम माळगावकर, ह.भ.प. संतोष मोहिते यांसह सर्वश्री राम शिंदे, शिंदेबुवा, दिलीप कांबळे, वासुदेव उलतकर, नथू जाधव यांसह ४० धर्मप्रेमी आणि उपस्थित होते. दोन्हीही ठिकाणी समितीचे श्री. सतीश सोनार उपस्थित होते.
jai hind
Bikram singh majithia