Menu Close

हिंदु युवकाचा छळ करणार्‍या पोलिसांचे निलंबन न केल्यास आंदोलन !

  • मयूर खोले या हिंदु युवकाला खडकी (पुणे) पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचे प्रकरण

  • संयुक्त पत्रकार परिषदेत हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !

डावीकडून सर्वश्री मयूर खोले, पराग गोखले, नितीन महाजन, संतोष गोपाळ, कुणाल साठे, महेश पवळे, धनंजय क्षीरसागर, सचिन पाटील, लोकेश कोंढरे

पुणे : रामनवमी उत्सवाच्या वेळी व्हॉट्सअ‍ॅपवरून हिंदूंना संघटित होण्याचे आवाहन केल्याविषयी खडकी पोलिसांनी पाटील इस्टेट या भागात रहाणारे मातंग समाजाचे श्री. मयूर खोले यांना कह्यात घेऊन अमानुष मारहाण केली होती. श्री. मयूर खोले यांना पोलीस ठाण्यात धर्मांधांचे बूट चाटायला लावले होते. पोलिसांच्या या हिंदुद्वेषी आणि अमानवीय प्रकाराच्या विरोधात शहरातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या असून या प्रकरणी संबंधित दोषी अधिकार्‍यांचे तातडीने निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे. २० एप्रिल या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत दोषी पोलिसांवर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याची चेतावणी देण्यात आली. या पत्रकार परिषदेत श्री. मयूर खोले यांनी त्यांना आलेले हे वाईट अनुभव कथन केले.

या वेळी राजे शिवराय प्रतिष्ठानचे श्री. महेश पवळे, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. संतोष गोपाळ, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. कुणाल साठे, बजरंग दलाचे श्री. नितीन महाजन, हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. सचिन पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, पतित पावन संघटनेचे श्री. धनंजय क्षीरसागर, समस्त हिंदू आघाडीचे श्री. लोकेश कोंढरे, पतित पावन माथाडी संघटनेचे श्री. विजय गावडे आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

मयूर खोले : पुणे पोलिसांचा अमानुषपणा

पत्रकार परिषदेत श्री. मयूर खोले यांनी व्यक्त केलेले अनुभव खाली दिले आहेत . . .

१. रामनवमीच्या निमित्ताने सार्वजनिक उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने मी ‘अयोध्या’ नावाचा व्हॉट्सअ‍ॅपचा गट बनवला होता.

२. पाटील इस्टेट हा मुसलमानबहुल भाग असून या भागात कायमच धर्मांधांकडून हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न होतो.

३. ८ एप्रिल या दिवशी एका क्षुल्लक कारणावरून धर्मांधांचा गट विशाल पिसाळ या हिंदु युवकाला मारण्यासाठी येत होता, अशी माहिती मिळाल्यानंतर मी ‘सर्व हिंदूंनी तेथील एका मंदिरात लवकरात लवकर जमावे, असा ‘व्हॉइस मेसेज’ (बोलणे ध्वनीमुद्रीत करून पाठवणे) केला.

४. त्याचा आधार घेऊन खडकी पोलिसांनी मला कह्यात घेतले. दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवून सायंकाळी मदन कांबळे, अनिरुद्ध सोनवणे आणि अन्य एक पोलीस कर्मचारी यांनी मला अमानुष मारहाण केली. डोक्याचे केस उपटले, तसेच तेथे असणार्‍या २ मुसलमानांचे जोडे (बूट) चाटायला लावले.

५. गंभीर मारहाणीमुळे मला लगेचच साईसमर्थ हॉस्पिटल येथे (उपचारासाठी) नेण्यात आले.

६. या प्रकरणी पोलिसांनी प्रारंभी माझी पोलिसांच्या विरोधात असणारी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली; मात्र याविषयी आवाज उठवल्यानंतर पोलीस आयुक्त व्यंकटेशम् यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *