अमरावती : अमरावती जिल्ह्यातील नांदुरा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्यात येतो. या प्रशिक्षण वर्गातील धर्मप्रेमींनी हनुमान मंदिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षण या विषयावरील फ्लेक्सचे प्रदर्शन उत्स्फूर्तपणे लावले. तसेच गावातील हनुमानभक्तांना याविषयीची माहिती सांगून धर्मप्रसार केला.
अचलपूर तालुक्यातही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षणवर्ग घेण्यात येतो. येथील धर्मप्रेमींनीही हनुमान मंदिरामध्ये धर्मशिक्षण या विषयावरील फ्लेक्सचे प्रदर्शन लावून धर्मप्रसार केला. अचलपूर तालुक्यातील धर्मप्रेमींनी मंदिरामध्ये आरती झाल्यानंतर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर व्हावी’ यासाठी सामूहिक प्रार्थना करून काही वेळ श्रीरामाचा आणि हनुमंताचा नामजपही केला.
विशेष
दोन्ही ठिकाणचे वर्ग केवळ दोन मासांपासून चालू आहेत. ‘ही सेवा करून आनंद मिळाला’, असे मत धर्मप्रेमींनी व्यक्त केले.