काठमांडू : येथील मष्टो कुलदेवता प्रतिष्ठान आणि खडका क्षत्रिय महासभेच्या सदस्यांसाठी श्री. विष्णु बहादुर क्षेत्री यांनी १०.४.२०१९ या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले होते. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘आज हिंदु धर्मविरोधकांनी धर्माविषयी भ्रम निर्माण केल्यामुळे हिंदूंमध्ये न्यूनगंड निर्माण झाला आहे. घरात एखादा नोकर ठेवायचा म्हटला, तरी आपण त्याची शैक्षणिक पात्रता, शारीरिक आणि बौद्धिक क्षमता आदींचा विचार करतो; पण या लोकशाहीमध्ये एखादा अपात्र नेता देशात कायदा बनवू शकतोे आणि देश चालवू शकतो. ही कसली लोकशाही ? या लोकशाहीतील शिक्षण व्यवस्थेत आधी ‘डोनेशेन’ (देणगी) नंतर अॅडमिशन (प्रवेश) आणि नंतर ‘एज्युकेशन’ (शिक्षण) अशी व्यवस्था आहे. आज प्रत्येक व्यवस्था ढासळली आहे. न्यायव्यवस्थेत जनतेला न्याय न मिळता केवळ तारीख मिळते. आज प्रवाहाविरुद्ध जाऊन मोठे निर्णय घेणार्या नेतृत्वाची आवश्यकता आहे.’’
या वेळी मष्टो कुलदेवता प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. मोहनसिंह खडका आणि राजकीय विश्लेषक डॉ. सुरेंद्र के.सी. हे उपस्थित होते.