Menu Close

केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिवाकडून स्वामी चिदानंद पुरी यांचा अवमान

हिंदुद्वेषी माकपकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ? पाद्री, इमाम, मौलवी यांचा अवमान करण्याचे धाडस कधी माकप दाखवतो का ?

थिरूवनंतपूरम् : केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन् यांनी येथील अद्वैत आश्रमाचे गुरु स्वामी चिदानंद पुरी यांचा अवमान केला. ‘स्वामी चिदानंद पुरी हे भोंदू आहेत. तसेच ते भगव्या वेशातील संघाचे कार्यकर्ते आहेत’, असा आरोप कोडियेरी बालकृष्णन् यांनी केला. स्वामी चिदानंद पुरी हे ‘शबरीमला कर्म समिती’चे नेते आहेत. शबरीमला मंदिराची परंपरा जपण्यासाठी स्वामी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे केरळमधील साम्यवादी नेते संतप्त झाले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *