- जगातील समस्त आतंकवाद्यांचे पाक हे माहेरघर आहे. त्यामुळे जागतिक शांततेसाठी पाकचा निःपात आवश्यक !
- तमिळी हिंदूंच्या ‘लिट्टे’ संघटनेवर कारवाई करून ३५ सहस्र हिंदूंचे शिरकाण करणारे श्रीलंकेचे सैन्य आता पाकच्या विरोधात काही कृती करील का ?
कोलंबो : येथील साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी कोलंबो पोलिसांनी ९ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. या नागरिकांनी आतंकवाद्यांना बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि अन्य सुविधा पुरवल्या होत्या. या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे.
गुप्तचर यंत्रणेतील अधिकार्यांनी जाणीवपूर्वक बॉम्बस्फोट होऊ दिले ! – श्रीलंकेच्या मंत्र्याचा दावा
श्रीलंका सरकारमधील मंत्री लक्ष्मण किरियेल्ला यांनी संसदेत आरोप केला की, भारताने दिलेल्या गोपनीय माहितीनंतरही श्रीलंकेच्या गुप्तचर विभागातील काही अधिकार्यांनी जाणीवपूर्वक कारवाई केली नाही. याची चौकशी केली पाहिजे. कोणत्याही स्थानिक साहाय्याविना इतके मोठे आक्रमण होऊच शकत नाही.
श्रीलंका पोलिसांचे प्रवक्ते रुवान गुनासेकरा यांनी सांगितले की, या स्फोटांच्या प्रकरणी आतापर्यंत ६० जणांना अटक करण्यात आली आहे.
एकूण ९ आत्मघाती आतंकवाद्यांनी स्फोट घडवले. यांपैकी २ आतंकवाद्यांची ओळख पटली आहे. देशातील मसाल्याचे मोठे उद्योगपती महंमद युसूफ इब्राहिम यांची ती मुले आहेत. इमसथ अहमद इब्राहिम आणि इल्हाम अहमद इब्राहिम अशी त्यांची नावे आहेत. या आत्मघाती आक्रमणात एका महिलेचाही समावेश होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात