Menu Close

कॅनडाने पाठवलेला कचरा माघारी न नेल्यास युद्ध करू : फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते

कुठे कचरा माघारी न नेल्यास युद्धाची घोषणा करणारा छोटासा फिलिपिन्स, तर कुठे गेली ३ दशके भारतात आतंकवादी कारवाया करणार्‍या पाकला एकदाही अशी चेतावणी न देणारा आणि प्रत्यक्षातही निष्क्रीय रहाणारा भारत !

मनिला (फिलिपिन्स) : एका आठवड्यात कॅनडाने त्याचा अनधिकृत कचरा माघारी न्यावा अन्यथा कचर्‍याचा डोंगर पाठवून देऊ. फिलिपिन्स आता स्वस्थ बसणार नाही. दोन्ही देशांमध्ये शत्रूत्व निर्माण झाले, तरी चालेल. आम्ही युद्धाची घोषणा करू. तुम्हाला इच्छा असेल, तर हा कचरा तुम्ही खाऊ शकता, अशा शब्दांत फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते यांनी कॅनडाला चेतावणी दिली आहे. तसेच दुतेर्ते यांनी प्रशासनाला आदेश देत एक जहाज सिद्ध ठेवण्यासही सांगितले आहे. कॅनडाने या जहाजातून कचरा मागे न्यावा अन्यथा हा कचरा पुन्हा कॅनडाला पाठवण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

वर्ष २०१३ आणि २०१४ मध्ये कॅनडाने ‘रिसायकल’ (पुनर्प्रक्रिया) करण्यासाठी कचर्‍याचे १०० कंटेनर फिलिपिन्सला पाठवले होते. यामध्ये विषारी कचरा भरला गेल्याचा आरोप फिलिपीन्सने केला आहे. यामध्ये केवळ प्लास्टिक असल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात अबकारीच्या अधिकार्‍यांना त्यांमध्ये घाणेरडे डायपर आणि स्वयंपाकघरातील कचराही मिळाला होता.

कॅनडाचे म्हणणे आहे की, हा कचरा एका खासगी आस्थापनाने पाठवला होता, खासगी क्षेत्रावर कॅनडा सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही.

फिलिपिन्सच्या न्यायालयाने वर्ष २०१६ मध्येच कचरा पाठवणार्‍यांना त्यांच्या खर्चाने कचरा मागे नेण्याचा आदेश दिला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *