Menu Close

उपेंद्र कुशवाह यांच्याकडून भाजपवर टीका करतांना माता सीतेवर आक्षेपार्ह विधान

भाजपवर टीका करण्यासाठी उपेंद्र कुशवाह यांना अन्य उदाहरणे देता आली असती; मात्र त्यांनी माता सीतेची भूमिका करणार्‍या व्यक्तीवर टिप्पणी करून माता सीतेचा अवमान केला आहे. यासाठी त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

दरभंगा (बिहार) : मी भाजपची मानसिकता जवळून पाहून आलो आहे; कारण मी भाजप आघाडीमध्ये राहून आलेलो आहे. त्याच्या आत काय आहे, बाहेर काय आहे हे पाहिले आहे. रामलीलेत मंच सजवला जातो. पडदा लावला जातो. जेव्हा पडदा वर जातो तेव्हा विशिष्ट व्यक्ती माता सीतेचे रूप धारण करून येते. देवीचे रूप धारण केल्यामुळे आई-बहिणी त्या व्यक्तीसमोर डोके टेकतात. त्या व्यक्तीला इतका सन्मान मिळतो; मात्र पडद्याच्या समोर सीतेचे रूप आणि पडद्यामागे जाऊन पाहावे, तर तीच सीता सिगारेट ओढतांना दिसते. हाच भाजपचा खरा तोंडवळा आहे. भाजपमध्ये सर्व कर्म कुकर्म होत असते. बाहेर मात्र देवतांचे रूप असते. देवीचे रूप जनतेच्या समोर मंचावर असते; मात्र आतमध्ये असणारे सिगारेटवाले रूप मी पाहून आलो आहे, अशी टीका राष्ट्रीय लोक समता पार्टीचे (आर्एल्एस्पीचे) अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी केले आहे. ते दरभंगा येथील प्रचारसभेला संबोधित करत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *