भारतात घातपात करण्याची शक्यता
- आतंकवाद्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यात वेळ का वाया घालवायचा ? त्याऐवजी ते असतील, तेथे घुसून त्यांचा निःपात का केला जात नाही ?
- हिंदूंना आतंकवादी म्हणणारे ‘इस्लामिक स्टेटचे आतंकवादी कोणत्या धर्माचे आहेत’, हे का सांगत नाहीत ?
नवी देहली : श्रीलंकेत इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटांनंतर भारतीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. भारतीय वंशाचे ५० हून अधिक आतंकवादी अफगाणिस्तान आणि सीरिया येथे राहून भारतात घातपात करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्यावर भारतीय यंत्रणांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. हे सर्व संशयित भारतातील विविध राज्यांतून तेथे गेलेले आहेत.
भारतात यापूर्वी इस्लामिक स्टेटच्या संशयित आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांतील सर्वाधिक उत्तरप्रदेशातील तरुण आहेत. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने आतापर्यंत इस्लामिक स्टेटच्या विरोधात २६ गुन्हे नोंदवले आहेत. गेल्या ५-६ वर्षांत १०० हून अधिक संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांना उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, केरळ आणि तमिळनाडू येथून अटक करण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात