Menu Close

ख्रिस्त्यांच्या देशनिष्ठेविषयी शंका उपस्थित करणार्‍या भाजपच्या नेत्यावर ख्रिस्ती धर्मगुरूंची टीका

  • गरीब हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याच्या सूत्रावर ख्रिस्ती धर्मगुरु ‘ब्र’ही काढत नाहीत !
  • ख्रिस्त्यांना ठराविक पक्षांनाच मतदान करण्याचे आवाहन करून कायदाद्रोह करणार्‍या धर्मगुरूंविषयी अन्य ख्रिस्ती धर्मगुरु मूग गिळून गप्प बसतात, हे लक्षात घ्या !

बेंगळूरू : मुसलमानांप्रमाणे ख्रिस्त्यांनाही भाजपने निवडणुकीत उमेदवारी दिली नाही; कारण ख्रिस्ती देशाशी एकनिष्ठ नाहीत आणि प्रामाणिकही नाहीत, असे विधान कर्नाटकातील भाजपचे नेते ईश्‍वरप्पा यांंनी निवडणूक प्रचाराच्या वेळी केले होते. त्यावर  बेंगळूरूचे आर्चबिशप डॉ. पीटर मचाडो यांनी टीका केली आहे. डॉ. मचाडो हे कर्नाटक विभाग कॅथॉलिक बिशप परिषद आणि कर्नाटक मानवाधिकार संघटनेचे अध्यक्षही आहेत.

डॉ. पीटर मचाडो यांनी प्रसारित केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,

१. कर्नाटकातीलच नव्हे, तर संपूर्ण भारतातील शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांत ख्रिस्ती निरपेक्ष सेवा करण्यात अग्रेसर आहेत.(ख्रिस्ती निरपेक्ष सेवा करतात, यावर शंका आहे. ते ‘निरपेक्ष सेवे’च्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांचा बुद्धीभेद तरी करतात, हाच आतापर्यंतचा इतिहास आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यामुळे ईश्‍वरप्पा यांच्या विधानामुळे देशातील सर्व ख्रिस्त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

२. अनेक ख्रिस्ती धर्मियांनी भारतीय सैन्य, पोलीस आदी सुरक्षायंत्रणांत गौरवास्पद कामगिरी केली आहे. अनेकांनी देशासाठी बलीदानही केले आहे. त्यासाठी त्यांनी अनेक पुरस्कारही पटकावले आहेत. असे असतांना ‘ते देशाशी एकनिष्ठ नाहीत’, असे म्हणणे योग्य नाही.

३. सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या मदर तेरेसा यांना नोबेल पारितोषिकासमवेत ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही सन्मानित केले गेले आहे. (तेरेसा यांनी केलेल्या कार्यातून समाजसेवा अल्प आणि हिंदूंचे धर्मांतर अधिक होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) असे असतांना ख्रिस्त्यांना ‘अप्रामाणिक’ कसे म्हणता येईल ?

४. डॉ. पीटर मचाडो पुढे म्हणाले, ‘‘मी वरील विधान आधीही केले असते; मात्र त्यामुळे राज्यात ख्रिस्त्यांनी आंदोलने केली असती आणि माझ्या बोलण्याला राजकीय रंग चढला असता. त्यामुळे मी संयम बाळगला.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *