कोलंबो : श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या संदर्भात सुरक्षारक्षकांनी पूर्व भागातील इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांवर धाडी घालून १५ आतंकवाद्यांना ठार केले. श्रीलंकेच्या सैन्याचे प्रवक्ते सुमित अटापटू यांनी सांगितले की, सुरक्षारक्षकांनी जेव्हा कलमुनई शहरात बंदूकधार्यांच्या तळांमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी तिथे लपलेल्या आतंकवाद्यांनी गोळीबार चालू केल्यावर सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. यामध्ये इस्लामिक स्टेटचे १५ आतंकवादी ठार झाले. या चकमकीत एक स्थानिक नागरिकाचाही मृत्यू झाला.
Dynamite sticks, IS flag seized in security forces raids #Samanthurai #SriLanka pic.twitter.com/SWU5uqqy1n
— Ruptly (@Ruptly) April 26, 2019
श्रीलंकेत इस्लामिक स्टेटचे १३० ते १४० संशयित आतंकवादी असल्याची शक्यता ! – राष्ट्रपती मैत्रिपाला सिरीसेना
कोलंबो : श्रीलंकेत इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेशी संबंधित असलेले सुमारे १३० ते १४० संशयित आतंकवादी आहेत. यांंपैकी ७० जणांना अटक करण्यात आली आहे. इतर संशयितांनाही लवकरच अटक केली जाईल. देशातील आतंकवादाचे जाळे नष्ट करण्याचे प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरीसेना यांनी दिली. संरक्षण सचिव आणि पोलीस महानिरीक्षक त्यांचे कर्तव्य बजावण्यात असमर्थ ठरल्याने त्यांना त्यागपत्र देण्याचा आदेश देण्यात आला आहे. आतंकवादी कारवाईची पूर्वसूचना देणारी माहिती मिळाल्यावर त्यांनी ती तातडीने वरिष्ठांना दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झालेले श्रीलंकेतील काही संशयित पुन्हा मायदेशी परतल्याची माहिती सरकारला होती; मात्र परदेशातील आतंकवादी संघटनेत सहभागी होणे, हे श्रीलंकेतील कायद्याच्या विरोधात नसल्याने त्यांना अटक करणे शक्य नसल्याचे श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सांगितले. त्या संघटनेतील संशयितांनी हा घातपात घडवल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात