मुंबई, नवी मुंबई, बोईसर येथे सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांचा उपक्रम !
मुंबई : हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सनातन प्रभात नियतकलिकांचे वाचक, धर्मशिक्षणवर्गातील महिला आणि धर्मप्रेमी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घारोग्य लाभावे अन् हिंदु राष्ट्र स्थापनेत येणारे अडथळे दूर व्हावेत यांसाठी मुंबईतील विविध ठिकाणांसह, नवी मुंबई, तसेच बोईसर येथे देवाला साकडे घातले.
वरळी
बीडीडी चाळ येथील श्री अंबादेवी मंदिर येथे २४ एप्रिलला साकडे घालण्याचा उद्देश सांगून साकडे घातले. या वेळी वाचक, धर्माभिमानी आणि जिज्ञासू असे ४० जण सहभागी झाले होते.
अंधेरी (प)
चार बंगला, म्हाडा येथील श्री गणेश मंदिर येथे २२ एप्रिल या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष बंदरकर यांनी साकडे वाचले. येथे भाविक, धर्मप्रेमी, तसेच सनातन संस्थेच्या साधकांसह २२ जण उपस्थित होते.
सांताक्रूझ (पू)
कदमवाडी, वाकोला येथील साईबाबा मंदिर येथे १८ एप्रिल या दिवशी साकडे घालण्यात आले. याचे वाचन सनातन संस्थेच्या साधिका सौ. अश्विनी परब यांनी केले. या वेळी १५ धर्मप्रेमींसह १९ जण उपस्थित होते.
जोगेश्वरी (पू)
शामनगर येथील इच्छापूर्ती गणेश मंदिर येथे १६ एप्रिलला साकडे वाचनाच्या प्रसंगी धर्मशिक्षणवर्गातील १५ महिला, सनातन संस्थेचे ४ साधक यांसह २६ जण उपस्थित होते. साकडे घालण्यासाठी मंदिरातील भाविकांना बोलावल्यावर ते लगेच त्यात सहभागी झाले. यातील २ युवकांना, तसेच या ठिकाणी सेवेतही सहभागी झालेल्या धर्मशिक्षणवर्गातील महिलांना साकडे घालण्याचा उपक्रम पुष्कळ आवडला. साकडे घालण्यासाठी विश्वस्तांना भ्रमणभाष केल्यावर त्यांनी लगेच अनुमती दिली. सनातन संस्थेच्या साधिका सौ. ज्योती सबरद यांनी साकडे वाचले.
गोरेगाव (पू)
मसुराश्रम येथे हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी १२ एप्रिलला प्रार्थना केली. या वेळी मसुराश्रमाचे व्यवस्थापक श्री. भाऊराव पाटील, श्री. दिलीप वरूणकर, पुजारी ब्रह्मचारी नारायणगुरुजी, सज्जनबुवागुरुजी, तसेच श्री. विजय मेस्त्री, श्री. विनोद पागधरे या धर्मप्रेमींसह २० जणांची उपस्थिती लाभली. साकडे घालण्यासाठी अनुमती घेतांना एका धर्मप्रेमीने ‘ही प्रार्थना विश्वाची प्रार्थना आहे’, असे म्हटले.
गोरेगाव (प)
मोतीलालनगर १ येथील श्री संकल्पसिद्धी गणेश मंदिर येथे २२ एप्रिलला साकडे घालण्यात आले. ‘लवकरात लवकर हिंदु राष्ट्र येण्यासाठी आणि परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्त साकडे घालायचे आहे’, असे मंदिरातील गुरुजींना सांगितल्यावर त्यांनी त्यासाठी लगेच अनुमती दिली. येथे धर्मशिक्षणवर्गातील ५ महिला, ३ वाचक यांसह २३ धर्माभिमानी उपस्थित होते. येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. निनाद ओकयांनी साकडे घातले.
कांदिवली (प)
डहाणूकरवाडी येथील दत्त मंदिर येथे २५ एप्रिलला मंदिराचे पुजारी श्री. किशोर जोशी यांनी साकडे घातले. येथे २० धर्मप्रेमींसह २७ जण उपस्थित होते.
भांडुप (पू)
अशोकनगर येथील दत्त मंदिर येथे २५ एप्रिलला साकडे घालण्यात आले. कार्यक्रमात मंदिराचे अध्यक्ष श्री. पांडुरंग गावकर यांसह ३१ जणांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
भांडुप (प)
सह्याद्रीनगर येथील शिवमंदिर येथे २६ एप्रिल या दिवशी सनातन प्रभातचे वाचक श्री. बापर्डेकर यांनी देवासमोर साकडे वाचले. नवीन धर्मशिक्षणवर्गातील जिज्ञासूंना या उपक्रमाची माहिती दिल्यावर ते यात सहभागी झाले, तसेच मंदिराच्या शेजारी असलेल्या ‘दीपक ट्युटोरिअल’ या शिकवणीवर्गातील २१ विद्यार्थ्यांसह ३१ जण येथे उपस्थित होते.
ऐरोली, नवी मुंबई
सेक्टर ३ येथील सप्तश्रृंगीमाता मंदिर येथे मंदिराचे पुजारी श्री. सुधीर गोस्वामी यांनी २२ एप्रिलला सप्तश्रृंगीदेवीला साकडे घातले. या वेळी धर्मशिक्षणवर्गातील ४ महिलांसह १४ जण उपस्थित होते.
खारघर, नवी मुंबई
सेक्टर १२ येथील शिवमंदिर येथे २५ एप्रिलला मंदिरातील पुजार्यांनी साकडे घातले. येथे धर्मशिक्षणवर्गातील ८ महिलांसह २२ जण उपस्थित होते.
बोईसर (जिल्हा पालघर)
येथील साईबाबा मंदिर, पास्थळ येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंडित चव्हाण यांनी २५ एप्रिलला साकडे घातले. त्यांनी साकडे घालण्याचा उद्देश सांगितल्यावर उपस्थित धर्माभिमान्यांना तो आवडला. त्यातील एक धर्माभिमानी महिला आस्थेने म्हणाल्या, ‘‘सनातन संस्थेच्या संस्थापकांना बरे वाटत नाही का ?, त्यांची प्रकृती ठीक आहे ना ?’’ या वेळी मंदिराचे अध्यक्ष श्री. राजेंद्र मिस्त्री यांसह १८ जण उपस्थित होते.