ऐरोली (नवी मुंबई) : येथील ‘शाह क्लासेस’मध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्माची आवश्यकता’ या विषयावर समितीच्या सौ. स्नेहा हरमळकर यांनी १० वीच्या विद्यार्थ्यांना २४ एप्रिल या दिवशी आणि डॉ. (सौ.) ममता देसाई यांनी १२ वीच्या विद्यार्थ्यांना २५ एप्रिल या दिवशी मार्गदर्शन केले. ‘सध्याचे जग हे स्पर्धात्मक असल्याने त्यात टिकून रहाण्यासाठी सतत धावपळ करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रत्येक व्यक्ती तणावात जीवन जगत असते; मात्र योग्य आध्यात्मिक मार्गाने साधना केल्यास आत्मबळ वाढून व्यक्ती अशा तणावाला सहज सामोरे जाऊ शकते. यासाठी साधना करणे आवश्यक आहे’, असे मार्गदर्शन वरील वक्त्यांनी केले. साधना कोणती करावी ?, नामजप आणि प्रार्थना यांचे महत्त्व काय ? साधनेमुळे वैयक्तिक जीवनातही कसा लाभ होतो ?, इत्यादी सूत्रांवरही मार्गदर्शन करण्यात आले. या प्रवचनाचा १५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
या वेळी ते म्हणाले, ‘‘हे कार्य चांगले आहे. मलाही सनातन प्रभातचा अंक चालू करा आणि पुढील वेळी ग्रंथ घेऊन या.’’
‘शाह क्लासेस’चे श्री. सागर शाह यांना २४ एप्रिल या दिवशी करण्यात आलेले मार्गदर्शन आवडल्याने त्यांनी दुसर्या दिवशी १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही मार्गदर्शन करण्याची विनंती केली. यासह नवी मुंबईतील १३९ शिकवणीवर्गांचे संपर्क क्रमांक देऊन ‘अशा प्रकारचे मार्गदर्शन तेथे आयोजित करण्यास साहाय्य करू’, असे सांगितले.