- भारतात अवैधरित्या होणार्या गोहत्या रोखतांना होणार्या मारहाणीच्या घटनांवरून ‘देशात असहिष्णुता वाढली आहे’, असे म्हणणारे पुरो(अधो)गामी, निधर्मी आणि मानवाधिकारवाले श्रीलंकेतील ख्रिस्त्यांविषयी काही बोलतील का ? कि ‘ख्रिस्ती करत आहेत, ते योग्य आहे’, असे समजून ते मूकसंमती देणार आहेत ?
- भारतात ३ दशके जिहादी आतंकवादी कारवाया होत आहेत, काश्मीरमध्ये मशिदींवरील भोंग्यांवरून धमक्या देऊन साडेचार लाख हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडण्यात आले, तर सहस्रो हिंदूंना ठार करून महिलांवर बलात्कार करण्यात आले; मात्र हिंदूंनी कधी धर्मांधांवर हात उचलला नाही, हे निधर्मीवादी लक्षात घेतील का ?
- म्यानमारमध्ये बौद्ध आणि श्रीलंकेत ख्रिस्ती हे त्यांच्यावर आक्रमण करणार्या धर्मांधांना हाकलून लावण्याचा प्रयत्न करतात, तर भारतात हिंदू मार खात रहातात !
- जिहादी आतंकवादी कारवाया थांबल्या नाहीत, तर अशा घटना पुढे जगभरात होऊ लागल्यास आश्चर्य वाटू नये !
कोलंबो : येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेत मुसलमानांच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. या मुसलमानांना देशातून बाहेर हाकलण्यासाठी ख्रिस्ती धर्मीय रस्त्यावर उतरले असून नेगोम्बो शहरात ख्रिस्ती जमाव घरात घुसून मुसलमानांना प्रचंड मारहाण करत ठार करण्याच्या धमक्या देत आहे, असे वृत्त अमेरिकेतील दैनिक ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने प्रसिद्ध केले आहे. स्थानिकांच्या हवाल्यानेच ही माहिती मिळाल्याचे यात म्हटले आहे.
या घटनांनंतर ७०० मुसलमान कुटुंबे घर सोडून गेली आहेत, तर दहशतीखाली असणार्या अनेक मुसलमान कुटुंबांनी विविध ठिकाणी आश्रय घेतला आहे. ते सार्वजनिक ठिकाणी जाणेही टाळत आहेत, असे या वृत्तात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर येथील अनेक धर्मगुरूंनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.
श्रीलंकेत ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्यामध्ये हिंसाचार झाल्याचा इतिहास नाही. हे दोन्ही समुदाय अल्पसंख्यांक असल्याने आतापर्यंत ते एकत्र रहात होते; मात्र ‘चर्चमध्ये इस्लामिक स्टेटने केलेल्या स्फोटांनंतर परिस्थिती पालटली आहे’, असे एका पोलीस अधिकार्याने सांगितले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात