- श्रीलंकेसारख्या देशाकडून भारत कधीही शिकणार नाही; कारण भारतीय राजकारण्यांना भारताच्या सुरक्षेपेक्षा मुसलमानांच्या मतांची अधिक काळजी असते, हे लक्षात घ्या !
- कुठे एका जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर देशात बुरखाबंदी घालणारी श्रीलंका, तर कुठे गेली ३ दशके भारतात जिहादी कारवाया चालू असतांना बुरखाबंदीचे नावही न काढणारा भारत !
- श्रीलंका सरकारने घातलेल्या या बंदीचा तेथील कोणत्याही विरोधी पक्षाने विरोध केलेला नाही किंवा कोणत्याही तथाकथित पुरो(अधो)गाम्याने, निधर्मीवाद्याने अथवा मुसलमान संघटनेने विरोध केलेला नाही, हे लक्षात घ्या !
कोलंबो : येथील बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंका सरकारने देशात बुरखा आणि नकाब (महिलांनी डोळे सोडून संपूर्ण तोंडवळा झाकण्याचा प्रकार) यांसह तोंडवळा (चेहरा) झाकणार्या प्रत्येक गोष्टींवर बंदी घातली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी हा निर्णय घेतला आहे. याविषयीची माहिती ट्विटरवरून देण्यात आली आहे. आतंकवादी आक्रमणानंतर एका आठवड्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘तोंडवळा झाकणार्या कोणत्याही गोष्टींमुळे व्यक्तीची ओळख पटण्यास अडचण येऊ नये; म्हणून आपत्कालीन नियमांच्या अंतर्गत अशा गोष्टींवर प्रतिबंध घातला जात आहे. राष्ट्रपतींनी त्याविषयीचा निर्णय घेतला आहे.
हा निर्णय आजपासून लागू होत आहे. ज्या गोष्टींमुळे एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यात अडचणी येतात, अशा सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही साधनांनी तोंडवळा झाकणारी व्यक्ती राष्ट्र आणि जनता यांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात’, असे ट्वीट करण्यात आले आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करून जाऊ नका, असे आवाहन ‘ऑल सिलोन जमैयतूल उलेमा’ या श्रीलंकेतील मुसलमान संघटनेने मुसलमान महिलांना केले आहे.
श्रीलंकेत सैन्याच्या गणवेशात आतंकवाद्यांकडून पुन्हा आक्रमण होण्याची शक्यता
कोलंबो : २१ एप्रिल या दिवशी येथील चर्च आणि हॉटेल यांमध्ये इस्लामिक स्टेटच्या (आयएस्च्या) आतंकवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणल्यावर पुन्हा एकदा आतंकवाद्यांकडून आक्रमण होण्याची शक्यता श्रीलंकेच्या सुरक्षा अधिकार्यांकडून वर्तवण्यात आली आहे. हे आतंकवादी सैन्याच्या गणवेशात येण्याची शक्यता आहे. आतंकवादी २८ एप्रिललाच आणखी ५ ठिकाणांवर स्फोट घडवून आणण्याच्या सिद्धतेत होते; मात्र सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे अशी कोणतीही घटना घडली नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात