Menu Close

इस्लामिक स्टेटकडून ३३ देशांमध्ये आक्रमणे होण्याचा धोका

जिहादी आतंकवाद्यांच्या या धोक्याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ म्हणणारे काही बोलणार नाहीत; मात्र दुसरीकडे तथाकथित ‘भगवा आतंकवादा’वर तोंड उघडतील !

दमासकस (सीरिया) : सीरियातून इस्लामिक स्टेटला अमेरिकेने नष्ट केले असले, तरी जगभरातून तेथे आलेले आतंकवादी त्यांच्या देशात परतले आहेत आणि ते त्यांच्या देशात आतंकवादी आक्रमण करण्याची शक्यता आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. सीरियातून अनुमानेे ५ सहस ६०० आतंकवादी त्यांच्या देशात परतले आहेत. यामुळे ३३ देशांना धोका निर्माण झाला आहे, असे यात म्हटले आहे. श्रीलंकेत झालेले बॉम्बस्फोट हे याच प्रकारचे आक्रमण आहे, हे स्पष्ट होत आहे.

इस्लामिक स्टेटमध्ये (‘आयएस्’मध्ये) भरती होण्यासाठी जगातील ११० देशांतून ४० सहस्र मुसलमान तरुण सीरियामध्ये गेले होते. त्यांपैकी सर्वाधिक मुसलमान रशियातून गेले होते. सौदी अरब, जॉर्डन, ट्युनिशिया, पाकिस्तान आणि भारत यांसह जवळपास ३३ देशांतून जिहादी धर्मांध सीरियात आले होते. यांपैकी काही आतंकवाद्यांना आयएस्ने वेगवेगळ्या देशांत पाठवून आक्रमण घडवणे चालू केेले. त्यामुळे फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम आदी युरोपमधील देशांत आक्रमणे झाली होती.

इस्लामिक स्टेटने वर्ष २०१७ नंतर २९ देशांत १४३ आक्रमणे केली. त्यात २ सहस्र लोक ठार झाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *