ठाणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत भारतभरामध्ये अनेक राज्यांमध्ये मंदिर स्वच्छता, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत, यासाठी देवाला साकडे घालणे, असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यानिमित्ताने ठाणे, डोंबिवली, बदलापूर येथे मंदिर स्वच्छता आणि साकडे घालण्याचे उपक्रम घेण्यात आले. यासह भिवंडी येथील राहुरगाव येथे शौर्यजागरण उपक्रम घेण्यात आला.
विविध मंदिरांत साकडे !
‘भास्कर कॉलनी’ येथील भवानीमाता मंदिर, जागमाता येथील भोलेनाथ मंदिर, नौपाडा येथील घंटाळी मंदिर, ब्राह्मण सोसायटी येथील हनुमान मंदिर, खारेगाव येथील श्री अरण्येश्वर महादेव मंदिर, कळवा येथील हनुमान मंदिर, दत्तमंदिर, बदलापूर पूर्व आणि डोंबिवली पूर्व येथील रेणुकामाता मंदिर, नामदेववाडी येथील शिवमंदिर, सागरली जिमखाना येथील गणेश मंदिर या ठिकाणी साकडे घालण्यात आले.
मंदिर स्वच्छता आणि साकडे घालणे !
वर्तकनगर येथील दत्तमंदिरामध्ये स्वच्छता करून साकडे घालण्यात आले. ज्ञानेश्वरनगर येथील हनुमान मंदिराची स्वच्छता करण्यात आली. पवारनगर येथील अरण्येश्वर मंदिराची स्वच्छता करण्यात आली आणि साकडे घालण्यात आले. गोकुळनगर, खोपट येथील मारुति मंदिर आणि राधाकृष्ण मंदिर अन् कळवा येथील हनुमान मंदिर या मंदिरांची स्वच्छता करण्यात आली.
वैशिष्ट्यपूर्ण
- भास्कर कॉलनी येथील भवानीमाता मंदिरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष श्री. हरी माळी उपस्थित होते.
- घंटाळी मंदिर येथील हनुमान मूर्तीसमोर स्थानिक जोशीगुरुजी यांनी संकल्प सांगितला. या वेळी अधिवक्ता गणेश सोवनी उपस्थित होते.
- ब्राह्मण सोसायटी येथील हनुमान मंदिर येथे कीर्तनकार ह.भ.प. नामजोशी यांनी साकडे घातले.
राहुरगाव (भिवंडी) येथे शौर्यजागरण उपक्रम !
भिवंडी : हिंदूंना शौर्याचा इतिहास लाभला आहे. आज आपल्याला त्याचा विसर पडत चालला आहे. देशाची स्थिती पहाता हिंदु तरुणांनी संघटित होणे आवश्यक आहे. भारतीय सैन्यावर होणारी आतंकवादी आक्रमणे, भिवंडी आणि मुंबईतील आझाद मैदान यांसारख्या ठिकाणी पोलिसांवर होणारी आक्रमणे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. स्त्रियांवरील अत्याचारांतही वाढ होत आहे. त्यामुळे स्वतः चे रक्षण स्वतः करायला शिका, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल पाळेकर यांनी केले.
राहुरगाव (भिवंडी) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शौर्यजागरण उपक्रम घेण्यात आला. समितीच्या वतीने चालवल्या जाणार्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात गावातील युवकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला युवकांनी सकारात्मक प्रतिसाद देत वर्ग चालू करण्यास सांगितले.
क्षणचित्रे
- ‘राहुरगावाच्या प्रवेशद्वाराजवळच अन्य धर्मियांची २ प्रार्थनास्थळे आहेत. ते आम्हाला कधीही त्रास देऊ शकतात, त्यामुळे लगेच प्रशिक्षणवर्ग चालू करा’, असे युवकांच्या वतीने सांगण्यात आले.
- या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी गावातील सर्वच युवकांनी पुढाकार घेतला.