नालासोपारा : देवाचे स्मरण करून आपण आज अन्यायाविरुद्ध एकत्र येऊया. समाजात लाचखोर शासकीय कर्मचारी, तसेच अधिकारी सर्वसामान्य जनतेची अडवणूक करून अन्याय करत आहेत. अशा वेळी माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत माहिती मिळवून अन्यायाचे निवारण करायला हवे, असे मार्गदर्शन ‘हिंदुस्थान नॅशनल पार्टी’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी केले.
नालासोपारा (प) येथील लक्ष्मी-नारायण मंदिर सभागृहात २७ एप्रिल या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. विक्रम भावे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सागर चोपदार हेही उपस्थित होते. सूत्रसंचालन समितीचे श्री. प्रसाद काळे यांनी केले. अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी मार्गदर्शनात माहिती अधिकाराचा उपयोग कसा देवाचे स्मरण करून आपण आज अन्यायाविरुद्ध एकत्र येऊया. समाजात लाचखोर शासकीय कर्मचारी, तसेच अधिकारी सर्वसामान्य जनतेची अडवणूक करून अन्याय करत आहेत. करावा ?, याविषयीची संपूर्ण प्रकिया मांडली. या वेळी उपस्थितांना हिंदु विधीज्ञ परिषदेच्या कार्याचा माहितीपर ‘व्हिडिओ’ही दाखवण्यात आला.
श्री. विक्रम भावे यांनी उपस्थितांना ‘सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात माहिती अधिकाराचा प्रभावी वापर कसा करावा ?’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी ‘कायदेशीर लढा देण्यासाठी कसे सहभागी होऊ शकतो ?’ याविषयी अनेकांनी जिज्ञासेने जाणून घेतले. या कार्यशाळेत २१ धर्मप्रेमी उपस्थित होते. या ठिकाणी सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि राष्ट्र-धर्मपर लिखाण असलेले फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. तसेच सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचेही प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याला उपस्थितांचा चांगला प्रतिसाद लाभला.
वैशिष्ट्यपूर्ण
१. श्री. विक्रम भावे माहिती अधिकाराच्या वापराचे व्यक्तिगत अनुभव सांगत असतांना उपस्थित धर्मप्रेमी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवत होते. त्यांचा उत्तम प्रतिसाद होता.
२. काही धर्मप्रेमींनी ‘आम्हाला अमूल्य माहिती मिळाली. पुढे आम्ही स्थानिक प्रश्नांना वाचा फोडू’, असे सांगितले.