-
मदरशांतून आतंकवादी निर्माण होत असल्यामुळे पाकचा निर्णय !
-
धार्मिक शिक्षणासह नियमितचा अभ्यासक्रम शिकवणार
आता भाजप सरकारनेही देशातील मदरसे बंद करून तेथे शासकीय अभ्यासक्रम चालू केला पाहिजे !
रावळपिंडी : पाकमधील इम्रान खान यांचे सरकार देशातील ३० सहस्र मदरसे कह्यात घेणार आहे. या मदरशांमधून धार्मिक शिक्षणासह मुख्य धारेतील विषयही शिकवले जाणार आहेत, अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली. पुलवामाच्या आक्रमणानंतर पाकने देशातील १८२ मदरशांना नियंत्रणात घेतले होते.
पत्रकार परिषदेत बोलतांना पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी म्हटले की, मदरशांतून आतंकवाद पसरवला जातो; मात्र अशा मदरशांची संख्या अल्प आहे. वर्ष १९४७ मध्ये पाकमध्ये केवळ २४७ मदरसे होते. ते वर्ष १९८० मध्ये २ सहस्र ८६१ झाले आणि आता ही संख्या ३० सहस्र इतकी आहे. सरकारीकरण करण्यात येणार्या मदरशांत शिकवण्यात येणारा अभ्यासक्रम सिद्ध आहे. यात द्वेष पसरवणारे शिक्षण नसेल. तसेच मुलांना सर्व धर्मांचा सन्मान करण्याची शिकवण दिली जाईल. (याचाच अर्थ या मदरशांतून आतापर्यंत द्वेष आणि अन्य धर्मियांचा अनादर करण्याचेच शिक्षण मिळत होते, असा होतो. भारतातील मदरशांतून काय शिकवले जाते, हे भाजप सरकार पहाणार आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात