उचगाव (कोल्हापूर) : शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांचा २९ एप्रिल या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी हिंदु संस्कृतीनुसार वाढदिवस साजरा करण्याचे महत्त्व, तसेच हिंदु धर्मशास्त्र यांची माहिती दिली. या वेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री. सागर पाटील, सर्वश्री भाऊ चौगुले, विक्रम चौगुले, दिनेश परमार, राजू सांगावकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. महेश खांडेकर, श्री. विराग करी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांसह अन्य उपस्थित होते.