एका निलंबित साम्यवादी विचारसरणीच्या सनदी अधिकार्याने हे ‘अकाऊंट’ बंद केल्याचे वृत्त
- भारताच्या इतिहासाची खरी माहिती देणारे ‘अकाऊंट’वर बंदी घालणार्या भारतद्वेषी ‘ट्विटर’वर भाजप सरकारने कारवाई करणे अपेक्षित आहे !
- ‘ट्विटर’चा भारतद्वेष आणि हिंदुद्वेष जाणा ! ‘ट्विटर’वर आतंकवादी, जिहादी आणि भारतद्वेषी सातत्याने भारत अन् हिंदु धर्म यांवर गरळओक करत असतात. त्यांचे ‘अकाऊंट’ बंद करण्याची बुद्धी ‘ट्विटर’च्या अधिकार्यांना होत नाही; मात्र भारताचा खरा इतिहास सांगणारे ‘अकाऊंट’ तात्काळ बंद केले जाते !
मुंबई : भारताच्या इतिहासाची हेतूपुरस्सर खोटी माहिती प्रसारित करणार्यांचा समाचार घेणारे आणि त्यांच्या चुका दाखवून देणारे ‘@Trueindology’ हे ट्विटर ‘अकाऊंट’ (खाते) ट्विटरने बंद केले आहे. या ‘अकाऊंट’चे लाखो ‘फॉलोअर्स’ आहेत. हेे ‘अकाऊंट’ बंद करण्यामागे केंद्र सरकारमधील एक निलंबित साम्यवादी विचारसरणीचा सनदी अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. या साम्यवादी विचारसरणीच्या अधिकार्याने स्वतःच्या पदाचा दुरुपयोग केल्याने त्याला निलंबित केले होते. (साम्यवादी विचारसरणीच्या अधिकार्यांचे खरे स्वरूप ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘हे अकाऊंट पुन्हा चालू करावे’, अशी समाजातून मागणी केली जात आहे.
१. या संदर्भातील वृत्त ‘ऑप इंडिया’च्या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे. यात म्हटले आहे की, या निलंबित सनदी अधिकार्याने डाव्या विचारसरणीच्या आरफा खानम शेरवानी यांच्या माहितीचा आधार घेत हिंदु-मुलसमान ऐक्य आणि होळी उत्सव याविषयी ट्वीट केले होते. त्याविषयीची माहिती अत्यंत चुकीची असल्याचे ‘@Trueindology’ या टि्वटर अकाऊंटवरून ट्वीट करून सांगण्यात आले होते, तसेच हिंदु-मुसलमान ऐक्य किती बेगडी समजूत आहे, हे सांगण्यात आले होते. त्यावरून या अधिकार्याने धमकी दिली होती की, हे अकाऊंट कोण चालवते ते शोधून काढेन आणि ते कायमस्वरूपी बंद करून टाकीन. (प्रशासनातील साम्यवादी विचारसरणीचे अधिकारी हे भारतविरोधी आणि हिंदुविरोधी कारवाया करण्यासाठी पदाचा दुरुपयोग करतात, हेच यातून सिद्ध होते. अशांवर सरकार काय कारवाई करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. साम्यवादी विचारसरणीच्या लोकांकडून केले जाणारे खोडसाळ दावे आणि ‘एन्डीटीव्ही’ वृत्तवाहिनीवरून दाखवल्या जाणार्या खोट्या बातम्या यांवर टीका करत त्यांचे खरे स्वरूप उघड करण्याचे काम ‘@Trueindology’ने वारंवार केले आहे.
३. काही दिवसांपूर्वी एक पोस्ट प्रसारित झाली होती. यात म्हटले होते, ‘गोरखनाथ मंदिर हे मुसलमान बादशाहाने दान दिले होते.’ ही पोस्ट बोगस असून त्यातील तथ्ये खोटी आहेत हे ‘@Trueindology’ने पुराव्यानिशी दाखवून दिले होते.
४. सातत्याने साम्यवाद्यांना अशा प्रकारे विरोध केल्यामुळे हे ‘अकाऊंट’ यापूर्वीही काही वेळा तात्पुरते बंद करण्यात आले होते, असे या बातमीत म्हटले आहे. (साम्यवाद्यांची मोगलाई ! साम्यवाद्यांच्या दबावामुळे अशी बंदी घातली जाते, तर भाजप सरकार अधिकारांचा वापर करून अशांना अभय का देत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात