केवळ एखाद्या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित केल्याने आतंकवादी कारवाया थांबणार नाहीत, हे लक्षात घ्यायाला हवे ! अशा कृतींपेक्षा ‘आतंकवाद्यांना आणि त्यांच्या प्रमुखांना नष्ट केल्याने आतंकवाद संपणार आहे’, हे भारतीय शासनकर्ते लक्षात घेतील तो सुदिन !
नवी देहली : जैश-ए-मंहमदचा प्रमुख आतंकवादी मसूद अझहर याला अखेर संयुक्त राष्ट्राकडून आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यात आले. संयुक्त राष्ट्रात दोन वेळा चीनने नकाराधिकार वापरून मसूद याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला होता. गेल्या ९ वर्षांपासून यासाठी प्रयत्न करत होता. या बंदीमुळे संयुक्त राष्ट्रांच्या देशांत मसूद यााला जाण्यास बंदी असणार आहे. त्याची जगभरातील संपत्तीही जप्त करण्यात येणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात