पुणे : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, तसेच हिंदु धर्माचे कार्य करणार्या धर्मबांधवांचे आपत्काळात रक्षण व्हावे, या उद्देशाने २९ एप्रिल या दिवशी सातारा रस्ता भागातील जागृत अशा पद्मावती मंदिरात साकडे घालण्यात आले. सनातनचे साधक श्री. विजय बोरामणीकर यांनी पद्मावती देवीला हार आणि नारळ अर्पण केला. नंतर सर्वांनी देवीचे दर्शन घेऊन सामूहिक प्रार्थना केली. या वेळी रणसंग्राम ग्रुपचे अध्यक्ष श्री. महेश भोईबार, उपाध्यक्ष श्री. राहुल कदम, शिवसेनेचे श्री. अविनाश शुक्ला, तसेच धर्माभिमानी सर्वश्री विकास गोगावले, हेमंत डावळकर, प्रताप ठाकूर यांसह अनेक धर्माभिमानी आणि साधक उपस्थित होते.
भोर येथील गणपति मंदिर, वडगावशेरी येथील स्वामी समर्थ मंदिर, सांगवी येथील गजानन महाराज मंदिर, जुन्नर, चिंचवड (श्रद्धा गार्डन) आणि आव्हाळवाडी येथील हनुमान मंदिर, कात्रज येथील विश्वकर्मा मंदिर यांसह अनेक मंदिरांमध्ये साकडे घालण्यात आले.