Menu Close

धर्मशिक्षण घेऊन धर्मकार्यात यथाशक्ती सहभागी होण्याचा नांदेड येथील मुखेडवासियांचा निश्‍चय !

हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांचे हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियान !

मुखेड (जिल्हा नांदेड) : हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियानाच्या अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील बार्‍हाळी आणि मुखेड येथील धर्मप्रेमींच्या भेटी घेतल्या. या वेळी अनेक जणांनी धर्मकार्य जाणून घेतले, तसेच धर्मशिक्षण घेऊन धर्मकार्यात कृतीशील होण्याची सिद्धता दर्शवली.

विधानसभेत हिंदूंची बाजू मांडण्याविषयी भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड यांचे आश्‍वासन !

भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड

भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी समितीचे कार्य समजून घेतले. त्यांनी मुखेडमध्ये समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या प्रत्येक उपक्रमात सर्वतोपरी सहाय्य करू !, तसेच विधानसभेत हिंदूंची बाजू मांडण्यात येईल’, असे सांगून आश्‍वस्त केले. या वेळी आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले, ‘‘सनातन संस्थेने सिद्ध केलेले ग्रंथ येथील वाचनालय, तसेच अन्य संबंधित ग्रंथालयांमध्ये समाविष्ट करू.’’

  • गोवा येथे होणार्‍या अष्टम् अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी होण्याच्या दृष्टीने बार्‍हाळी येथील धर्मप्रेमी श्री. अरुण महाजन आणि त्यांचा सुपुत्र श्री. अभिजित महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी अष्टम् अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला पूर्णवेळ उपस्थित रहाण्याची सिद्धता दर्शवली.
डावीकडून श्री. अरुण महाजन, श्री. अभिजीत महाजन, श्री. मनोज खाडये आणि श्री. राजन बुणगे
  • बार्‍हाळी (जिल्हा नांदेड) येथे धर्मप्रेमी श्री. अरुण महाजन आणि श्री. अभिजित महाजन यांनी आयोजित केलेल्या बैठकीला ४५ धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी श्री. मनोज खाडये यांनी समितीच्या कार्याविषयी त्यांना अवगत करून ‘धर्मरक्षण, धर्मशिक्षण आणि राष्ट्ररक्षण यांची काळानुसार आवश्यकता’ याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थितांनी समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या धर्मशिक्षणवर्गाला येण्याची सिद्धता दर्शवली, तसेच सनातन प्रभातचे वर्गणीदार होण्याचा मानस व्यक्त केला. गावच्या पोलीस पाटलांनी तेथील मंदिरातील सप्ताहामध्ये ७ दिवस धर्मशिक्षणाविषयी मार्गदर्शन करण्याची मागणी केली, तसेच उपस्थित कीर्तनकारांनीही कीर्तनात राष्ट्र आणि धर्म यांविषयी माहिती सांगण्याची इच्छा व्यक्त केली. या प्रसंगी उच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री. मुरार देशपांडे यांची उपस्थिती लाभली.
बार्‍हाळी येथे धर्मप्रेमींच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना श्री. मनोज खाडये
  • मुखेड येथील व्यापारी श्री. अशोक मड्गुलवार यांनीही समितीच्या कार्यात यथाशक्ती सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.
  • मुखेड येथे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. बाबूराव देबडवार यांंनी समितीचे कार्य जाणून घेतले. ‘मुखेड येथे समितीच्या वतीने घेतल्या जाणार्‍या उपक्रमांत साहाय्य करू’, असे आश्‍वासन दिले. विशेष करून ‘शिक्षणक्षेत्रात चाललेला अनागोंदी कारभार रोखला जावा; म्हणून जनजागृतीसाठी कार्यरत रहायला हवे’, असे मत त्यांनी मांडले.

पू. प्रबोधन कालिदास महाराज यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा !

उजवीकडे पू. प्रबोधन कालीदास महाराज यांच्याशी वार्तालाप करतांना श्री. खाडये

पाळा येथील ‘श्री सद्गुरु अंबादास महाराज संस्थान’चे कालिदास गोपाळ महाराज पाळेकर आणि पू. प्रबोधन कालिदास महाराज पाळेकर यांची श्री. मनोज खाडये यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी श्री. खाडये यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चा त्यांना परिचय करून दिला. या वेळी कीर्तन परंपरेतला धर्मिकतेपेक्षा करमणुकीचे आलेले स्वरूप, विविध संप्रदायांतील संकुचितपणा, इतिहासाचे विकृतीकरण, हिंदु समाजात झालेले वैचारिक प्रदूषण यांविषयी महाराजांनी खंत व्यक्त केली. या वेळी पू. प्रबोधन कालिदास महाराज म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य आणि दृष्टीकोन पुष्कळ चांगले आहेत. तुम्हाला भेटून आनंद झाला.’’

विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांचे हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला आशीर्वाद !

विरुपाक्ष शिवाचार्य महाराज

मुखेड येथील गणाचार्य मठ संस्थानचे अध्यक्ष विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी समितीचे कार्य जाणून घेतले. समितीच्या धर्मशिक्षण, धर्मरक्षण आणि हिंदूसंघटन यांच्या कार्यात सक्रीय सहभागी होण्यासमवेतच गोवा येथील हिंदू अधिवेशनाला उपस्थित रहाण्याची सिद्धता दर्शवली. या वेळी महाराजांनी समितीच्या कार्याला आशीर्वादही दिले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *