Menu Close

श्रीलंकेकडे वाकड्या दृष्टीने पाहू नका : श्रीलंकेचे राष्ट्रपती सिरीसेना यांची इस्लामिक स्टेटला चेतावणी

  • शांततावादी आणि अहिंसावादी म्हणवणार्‍या बौद्ध धर्मातील असणारे सिरीसेना देशाच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारची चेतावणी देतात अन् बुरखाबंदीसारखे निर्णय घेतात; मात्र असुरांचे निर्दालन करणार्‍या देवता असणार्‍या हिंदु धर्मात जन्माला आलेले भारतीय शासनकर्ते कणाहीनतेचे दर्शन घडवतात, हे लक्षात घ्या !
  • लहान देश असणारी श्रीलंका एका जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर ‘दुःख व्यक्त करतो’ किंवा ‘भ्याड आक्रमण’ असे चौकटीतील शब्द वापरण्याऐवजी थेट इस्लामिक स्टेटच्या प्रमुखाला चेतावणी देते. भारतीय शासनकर्ते यातून काही शिकतील का ?

कोलंबो : लहान लहान देशांना लक्ष्य करून जगभरात जिहादच्या नावाने रक्तपात करण्याची योजना तुमच्याच अंगलट येईल. श्रीलंकेतील भीषण आतंकवादी आक्रमणानंतर सर्व जगच इस्लामिक स्टेटच्या (आयएस्च्या) विरोधात गेले आहे. तेव्हा यापुढे श्रीलंकेकडे वाकड्या दृष्टीने पाहू नका, अशी चेतावणी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी आयएस्चा प्रमुख अबू बकर अल् बगदादी याला दिली आहे.

सिरीसेना यांनी पुढे म्हटले आहे की, श्रीलंकेत निष्पाप नागरिकांचे रक्त सांडणार्‍या ISIS च्या आतंकवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा होणारच आहे, याचे भान आयएस्च्या प्रमुखाने लक्षात ठेवावेे. आतंकवादाच्या विरोधात अवघे जग आता एक झाले आहे, हे धर्माच्या नावाखाली जिहादी रक्तपात घडवणार्‍या आयएस्ने लक्षात ठेवावे. आयएस्च्या आतंकवाद्यांच्या पापांची शिक्षा त्यांना लवकरात लवकर मिळेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *