नांदेड : येथील चौफाळा भागातील ‘श्री शनैश्वर देवस्थान आणि श्री महर्षि मार्कंडेय शिवमंदिर’ येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने नुकतेच शौर्य जागरण शिबिर घेण्यात आले. भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून शिबिराचा आरंभ करण्यात आला. या शिबिरात ३० धर्मप्रेमी उत्साहाने सहभागी झाले होते. शिबिराचे आयोजन स्थानिक धर्मप्रेमींनी केले होते.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे नांदेड समन्वयक श्री. उदय बडगुजर म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्राविना सर्वसामान्य व्यक्ती सुखी आणि आनंदी होऊ शकत नाही. वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. त्यासाठी सर्वांनी या धर्मकार्यात वेळ देऊया. हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी साधनेचे पाठबळ आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी हिंदु राष्ट्रासाठी नियमित प्रार्थना करूया.’’ या वेळी समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनीही उपस्थितांना शौर्यजागृतीचे आवाहन केले. शिबिरात स्वरक्षण प्रशिक्षणवर्गही घेण्यात आला.