Menu Close

जोगेश्‍वरी (मुंबई) येथे ‘शौर्यजागरण शिबिरा’च्या माध्यमातून युवकांमध्ये स्वरक्षणाचे स्फुलिंग चेतवले !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा उपक्रम !

हिंदूंना त्यांच्यातील शौर्याची जाणीव करून देण्याच्या व्यापक उद्देशाने शिबिराचे आयोजन !

सौ. जान्हवी भदिर्के, श्री. हर्षद खानविलकर आणि दीपप्रज्वलन करतांना श्री. श्रीरंग (बाबा) सावंत

मुंबई : सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त जोगेश्‍वरी (मुंबई) येथे धर्मप्रेमी युवक-युवतींसाठी ‘शौर्यजागरण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. जोगेश्‍वरी (पू) येथेे गणेश मैदानात १ मे या दिवशी पार पडलेल्या या शिबिरात क्रांतीकारकांच्या यशोगाथांची माहिती सांगणार्‍या फलक प्रदर्शनालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेनेचे उपशाखाप्रमुख श्री. श्रीरंग (बाबा) सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शिबिराला प्रारंभ झाला. त्यानंतर ‘स्वरक्षण प्रशिक्षण – काळाची आवश्यकता’, शौर्य जागरण शिबिराचा उद्देश, हिंदूंमध्ये शौर्यजागरणाची आवश्यकता, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे धर्माधिष्ठीत हिंदु राष्ट्र स्थापनेविषयीचे विचार अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. उत्तरार्धात हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील कार्यकर्त्यांनी लाठीकाठी, कराटे, दंडसाखळी इत्यादींच्या साहाय्याने स्वरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवली. या वेळी ३० युवांसह ३९ जण उपस्थित होते. स्वरक्षण प्रशिक्षण हा विषय ‘आवड’ म्हणून नव्हे, तर ‘आवश्यकता’ म्हणून शिकणे आवश्यक आहे, असे एकमत या वेळी झालेल्या गटचर्चेत  झाले.

स्वरक्षण शिकल्याने दुष्प्रवृत्तींची वाटणारी भीती नष्ट होते ! – सौ. जान्हवी भदिर्के, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

प्रतिकारक्षमता निर्माण होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकले पाहिजे. त्यामुळे दुष्प्रवृत्तींची भीती नष्ट होते आणि आत्मविश्‍वास, तसेच शारीरिक क्षमता वाढते. राज्यघटनेने नागरिकांच्या मूलभूत अधिकारांत स्वतःच्या जिवाचे रक्षण करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामध्ये स्वतःचे शरीर अन् संपत्ती यांचे रक्षण, कुटुंबियांचे रक्षण, अपंग, निराधार व्यक्तीचे रक्षण आदींचा समावेश आहे.

हिंदूंवर धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अन्यायच चालू आहे ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

या देशात अल्पसंख्यांकांना संरक्षण देण्यासाठी कायदे आहेत. त्यांना संरक्षण देण्यासाठी ‘अल्पसंख्यांक आयोग’ आहे; मात्र बहुसंख्यांक हिंदु धर्मियांना कोणतेही संरक्षण नाही कि सवलत नाही. ख्रिस्त्यांनी अवैधपणे चालवलेल्या धर्मांतराविषयी पोलिसांकडे तक्रार केली, तरी पोलीस काही करत नाहीत; मात्र हिंदूंनी जरासा विरोध केला की, लगेचच हिंदूंवरच कारवाई केली जाते. हिंदू संघटित नाहीत, ते त्यांचे शौर्य प्रकट करत नाहीत, म्हणून धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हा अन्यायच चालू आहे.

‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी घटनाबाह्य असल्याचा थयथयाट चालू आहे ! – बळवंत पाठक, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द उच्चारला तरी पुरोगामी, निधर्मी, अन्य पंथीय आणि प्रसारमाध्यमे ‘हिंदु राष्ट्राची मागणी ही घटनाबाह्य आहे’ असा थयथयाट करतात. हिंदु राष्ट्राची मागणी ही घटनात्मकच आहे. इंदिरा गांधी यांनी वर्ष १९७६ मध्ये घटनादुरुस्ती करून राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द घुसडले. घटना दुरुस्तीद्वारे भारताला ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्र बनवता येते, तर अशा घटनादुरुस्तीच्या माध्यमातून भारत ‘हिंदु राष्ट्र’ का होऊ शकत नाही ?

प्रतिसाद

गोरेगाव येथील धर्मप्रेमी श्री. विराज कारवारकर यांनी गोरेगाव येथे ‘शौर्यजागरण शिबिर’ घेण्याची सिद्धता दर्शवली. तसेच प्रत्येक रविवारी सायंकाळी ६.०० वाजता प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

विशेष सहकार्य

  • शिबिराची सिद्धता करण्यासाठी धर्माभिमानी, तसेच श्री. श्रीरंग (बाबा) सावंत, मंगेश कानडे, मंगेश शिंदे आणि अक्षय घाडगे यांनी पुढाकार घेतला.
  • शिबिरासाठी ओमशंकर क्रीडा मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

क्षणचित्रे

  • ‘स्वराज्य मराठा ढोल ताशा पथका’ने शिबिरापूर्वी ढोलवादन करून शौर्यजागरण शिबिरासाठी अनुकूल वातावरणनिर्मिती केली.
  • शिबिरातील प्रत्येक जण शेवटपर्यंत लक्षपूर्वक मार्गदर्शन ऐकत होता.

प्रतिक्रिया

१. या शिबिराने वैचारिक प्रबोधन झाले. स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याचे ठरवले आहे. हे राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ होण्यासाठी कार्य करण्याची इच्छा आहे ! –  श्री. सुनील सावंत

२. प्रत्येकाने देव, देश आणि धर्म यांच्याविषयी जागृत राहिले, तरच आपला टिकाव लागेल. राष्ट्रासाठी लढायला आवडेल. –  श्री. मंगेश कानडे

३. असे कार्यक्रम सर्वत्र व्हायला हवेत. मी अशा प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होईन ! – श्री. ओंकार पवार

४. शौर्यजागरण शिबिर हे स्फूर्तीदायक होते. स्त्रियांसाठी स्वरक्षण प्रशिक्षण हे अत्यावश्यक आहे. – कु. श्रावणी पवार

५. शिबिरातील मार्गदर्शन ऐकून आपणही राष्ट्र आणि धर्म यांसाठी काहीतरी केले पाहिजे, असे वाटते ! –  श्री. प्रविण महाडिक

६. स्वरक्षणासाठी मुलींनी प्रशिक्षण घ्यायलाच हवे ! – कु. दीपिका गावडे

Related News

0 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *