ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप !
प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांचा आरोप
नवी देहली : मुसलमानांमधील चालीरितींवर परखडपणे आसूड ओढणार्या प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी मदर तेरेसा सेवेच्या आडून धर्मांतर करत होत्या, असा आरोप केला आहे. व्हॅटिकन चर्चने कथितपणे गरिबांची सेवा करणार्या मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते तेरेसा गरिबीचे निर्मूलन करायचे नव्हते, तर त्यांना ख्रिस्ती धर्माचा प्रसार करायचा होता. (तत्कालीन काँग्रेस शासनाने तेरेसा यांना गरिबांच्या सेवेसाठी कि धर्मांतरासाठी भारतरत्न दिले होते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
तसलिमा यांनी तेरेसा यांना संत घोषित करण्यात येणार असल्याच्या संदर्भात ट्विटरवर खंत व्यक्त करतांना तेरेसा एक कट्टर धर्मांध आणि विश्वासघातकी होत्या, असे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी ट्विटरवर क्रिस्तोफर हिचेन्स या व्यक्तीचा मदर तेरेसा : नर्क की परी (मदर तेरेसा : नरकातील परी) नावाच्या युट्यूब व्हिडिओ ची लिंकही ठेवली आहे. यापूर्वी अनेकांनी तेरेसा यांचे मुख्य कार्य धर्मांतराचे असल्याची टीका केली आहे. तरेसा यांना भारताने वर्ष १९८० मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार दिला होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात