नालासोपारा : ‘स्व’रक्षण म्हणजे स्वतःचे रक्षण होय. स्वतःसाठी शरीरासह कुटुंब, घर, वसाहत, गाव, समाज, राष्ट्र आणि धर्म यांचीही आवश्यकता असते. या सर्वांचे रक्षण झाले, तरच खर्या अर्थाने ‘स्व’चे रक्षण होते. युवकांनी केवळ शरीरसौष्ठवाचा वैयक्तिक उद्देश न ठेवता व्यापक जनहिताचा उद्देश ठेवून शारीरिक बळ वाढवण्यावर भर दिला पाहिजे. देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी स्वरक्षण शिकले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत पुजारे यांनी केले. या वेळी १८ युवांसह २५ जण उपस्थित होते. नालासोपारा (पूर्व) येथे संत ज्ञानेश्वर माऊली रहिवासी संघ येथे नुकताच ‘शौर्यजागरण’ हा उपक्रम घेण्यात आला. या वेळी स्वरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या उपक्रमात स्थानिक मुलांनी सहभाग घेतला. या वेळी कराटे, दंडसाखळी, तसेच स्वतःचा बचाव करण्याची तंत्रेही दाखवण्यात आली. २८ एप्रिलपासून या ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यात आला आहे.
नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे शौर्यजागरण उपक्रम !
Tags : Hindu Janajagruti Samiti