श्रीलंकेच्या सैन्याधिकार्याच्या नावाने बनवले बनावट ट्विटर खाते !
डावपेचात भारतापेक्षा हुशार असलेला पाकिस्तान !
नवी देहली : श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर पाकिस्तानचे सैन्य बनावट ट्विटर खात्याद्वारे भारताच्या विरोधात अपप्रचार करत आहे. पाकिस्तानी सैन्याने श्रीलंकेच्या वरिष्ठ सैन्याधिकार्याच्या नावे ट्विटरवर बनावट खाते उघडून श्रीलंकेतील स्फोटांसाठी भारतच उत्तरदायी असल्याचा अपप्रचार चालू केला आहे.
१. याआधी ट्विटर आस्थापनाने पाकिस्तानी सैन्य आणि पाकची गुप्तचर यंत्रणा ‘आयएस्आय’ यांनी बनवलेली शेकडो बनावट ट्विटर खाती बंद केली होती; मात्र काही काळानंतर ट्विटरवर बनावट खाते उघडून त्यांचा अपवापर करण्याचे षड्यंत्र पाककडून पुन्हा रचले जात आहे.
२. भारताचा अवमान करण्यासाठी पाक सैन्याने श्रीलंकेचे ब्रिगेडियर एन्.एल्.के. समरसिंघे यांच्या नावाने ट्विटर खाते उघडून ‘भारत ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या आक्रमणांमध्ये थेट गुंतलेला आहे. गुप्तचर संस्थांनी पुरावे गोळा केले आहेत. आम्ही संयुक्त राष्ट्रांकडे पुरावे पाठवले आहेत आणि आम्हाला भारताविरुद्ध पुढील कारवाईची अपेक्षा आहे’, असा संदेश प्रसारित करण्यात आला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात