Menu Close

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना तेलंगण पोलिसांकडून अटक आणि सुटका

अवैध मशिदीच्या बांधकामाला विरोध केल्याचा परिणाम !

  • तेलंगण भारतात आहे कि पाकिस्तानात ? भारतात अवैध मशिदी बांधण्याला अनुमती आहे का ? आणि अशा बांधकामांना विरोध केल्यावर मशिदीवर कारवाई होण्याऐवजी तक्रार करणार्‍यावर कारवाई करण्याचा कायदा भारतीय राज्यघटनेत आहे का ?
  • एरव्ही राज्यघटनेचा अवमान होण्यावरून ऊर बडवणारे अशा प्रकरणात गप्प का बसतात ? कि अवैध मशिदींना विरोध करणे हेच चुकीचे आहे, असे त्यांना वाटते ?

भाग्यनगर (तेलंगण) : येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि भाजपचे आमदार टी. राजासिंह यांना पोलिसांनी ५ मेच्या रात्री अटक केल्यानंतर काही घंट्यांनी म्हणजे रात्री ३ वाजता त्यांची सुटका करण्यात आल्याची घटना घडली. येथील अंबरपेटमधील एका अवैध मशिदीच्या बांधकामाला विरोध केल्याने तणाव निर्माण होऊ नये, या कारणामुळे त्यांना अटक करण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने येथे पोलीस फौजफाटा होता. (असा फौजफाटा जिहादी आतंकवादी आणि धर्मांध यांना पकडण्यासाठी पोलीस का आणत नाहीत ? धर्मांधांनी दंगल घडवल्यावर पाठीला पाय लावून पळणारे आणि मार खाणारे पोलीस हिंदूंच्या विरोधात मात्र अशी मर्दुमकी दाखवतात ! – संपादक)

टी. राजासिंह यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली. ‘पोलिसांनी रझाकार सरकारच्या दबावाखाली येऊन ही कारवाई केली’, अशी टीका त्यांनी केली. (तेलंगणमधील तेलंगण राष्ट्र समितीचे सरकार ‘भारत निधर्मी देश आहे’, हे विसरून तो ‘इस्लामी देश’ आहे, अशा विचारातूनच हिंदूंचा छळ करून मुसलमानांना सोयीसुविधा पुरवत आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)

एका लोकप्रतिनिधीला अशी वागणूक देणारे पोलीस सामान्य हिंदूशी कसे वागत असतील ? – हिंदु जनजागृती समिती

आमदार टी. राजासिंह यांच्या अटकेच्या विरोधात ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त करतांना हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे की, धार्मिक भावना भडकवणारी जहाल वक्तव्ये करणार्‍या अकबरूद्दिन ओवैसी यांच्यावर अशी कारवाई करण्याचे धाडस भाग्यनगरच्या पोलिसांनी केले असते का? एका लोकप्रतिनिधीला अशी वागणूक देणारे पोलीस सामान्य हिंदूशी कसे वागत असतील ? आम्ही अवैध बांधकाम रोखणार नाही आणि कोणाला रोखू देणार नाही, या वृत्तीच्या पोलिसांकडून काय अपेक्षा करणार ?

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *