Menu Close

मुलुंड (मुंबई) येथील कार्यशाळेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत एकजुटीने कार्य करण्याचा धर्मप्रेमींचा निश्‍चय !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळा

कार्यशाळेत सहभागी झालेल्या धर्मप्रेमींसह मध्यभागी श्री. प्रमोद मुतालिक

हिंदु समाज छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणे शूर आहे, याची हिंदूंना जाणीव करून द्यायला हवी ! – प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना

मुंबई : हिंदु समाजाला जागृत करण्याचे दायित्व आपल्यावर आहे. त्यासाठी हिंदूंचे संघटन आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्र-धर्मासाठी लढले. हिंदु समाज त्यांच्याप्रमाणे शूर आहे, याची हिंदूंना जाणीव करून द्यायला हवी. हिंदूंना जागृत करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले पाहिजेत. हिंदु समाजात क्षात्रतेज वाढवणे आवश्यक आहे, असे ओजपूर्ण प्रतिपादन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. मुलुंड (पूर्व) येथील मुलुंड सेवासंघामध्ये ५ मे या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पार पडलेल्या हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्रीराम सेनेचे कर्नाटक कार्याध्यक्ष श्री. गंगाधर कुलकर्णीही उपस्थित होते. या कार्यशाळेत मुंबई, नवी मुंबई तसेच पालघर या जिल्ह्यांतील धर्मप्रेमींनी सहभाग घेतला.

धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना श्री. प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कर्नाटक कार्याध्यक्ष श्री. गंगाधर कुलकर्णी

कार्यशाळेचा आरंभ शंखनाद आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रथमेश कुडव यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि मूलभूत संकल्पना याविषयी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी उपस्थित धर्मप्रेमींना अवगत केले, तर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचे विविध प्रभावी उपक्रम (राष्ट्रीय हिंदू आंदोलन, हिंदु राष्ट्र-जागृती सभा, फलकप्रसिद्धी आदी) समाजापर्यंत कसे पोचवू शकतो या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील ठाकूर यांनी माहिती दिली. साधनेचे जीवनातील महत्त्व आणि गुरुकृपायोगानुसार साधना या विषयावर सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी मार्गदर्शन केले, तर स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व, तसेच स्वभावदोषांची व्याप्ती कशी काढावी ? यांविषयी हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या सौ. जान्हवी भदिर्के यांनी  माहिती सांगून धर्मप्रेमींना त्यानुसार कृती करण्यास प्रेरित केले. सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे प्रभावी धर्मप्रसार कसा करावा ? या विषयावर श्री. गणेश तांबे यांनी मार्गदर्शन केले. धर्मशिक्षणवर्गाला बोलवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना संपर्क करणे या विषयावरील प्रायोगिक भागात धर्मप्रेमींनी सहभाग घेतला. प्रत्यक्ष संपर्क करतांना यातील सूत्रांचा उपयोग करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

हिंदु राष्ट्रातील राजा हा आदर्शच असेल ! – सागर चोपदार, मुंबई समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

राजा चुकल्यास त्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार गुरूंना होता. आता तसे होत नाही. हिंदु राष्ट्रात मात्र ही स्थिती नसेल. हिंदु राष्ट्रातील राजा हा आदर्शच असेल; कारण हिंदु राष्ट्र ही आध्यात्मिक स्वरूपातील संकल्पना आहे. यामध्ये विश्‍वकल्याणासाठी सत्त्वगुणी लोक राज्य करणार आहेत. हिंदु राष्ट्रात अन्य धर्मियांना त्रास होणार असे नसून प्रत्येकाचा विचार केला जाणार असल्याने कोणालाही काळजी करण्याची आवश्यकता नाही.

क्षणचित्रे

  • जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्च्या घोषणांमुळे वातावरण उत्साही झाले होते.
  • धर्मप्रेमींचा कार्यशाळेत चर्चात्मक उत्स्फूर्त सहभाग होता.
  • वक्ता प्रशिक्षण आणि हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडणे, तसेच हिंदुत्वनिष्ठांना वैयक्तिक संपर्क करणे यांविषयीच्या प्रायोगिक भागात धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध विषय मांडले.

विशेष

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी नियमितपणे प्रयत्न करणार, स्वभावदोष निर्मूलन सत्संग आणि राष्ट्रीय भावसत्संग ऐकणार, तसेच धर्मकार्याच्या दृष्टीने एकत्रित येणार, असे शिबिराच्या शेवटी घेण्यात आलेल्या गटचर्चेत ठरले.

हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेविषयी श्री. प्रमोद मुतालिक यांचे उद्गार !

मुंबईसारख्या मोठ्या शहरात जागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत वार्तालाप करण्यासाठी ही संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो. हे धर्मकार्य संघटनाच्या माध्यमातून चालू ठेवायचे आहे, असे उद्गार श्री. मुतालिक यांनी हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेविषयी काढले.

श्री. प्रमोद मुतालिक यांनी कार्यशाळेत मांडलेली राष्ट्र-धर्म विषयक अन्य सूत्रे

  • काश्मीरमधून लाखो हिंदू विस्थापित झाले. आजही ते आपल्याच देशात भटकत आहेत. आपण मुंबईच्या हनुमान मंदिरात जातो; पण काश्मीरचे हनुमान मंदिर तोडले, तर हनुमंताच्या येथील भक्तांना वाईट का वाटत नाही ? मुंबईतील हिंदूंचा काश्मीर येथील हिंदूंशी संबंध नाही, अशी स्थिती आहे. आपल्याला वाटले पाहिजे की, आज त्यांच्यावर जी वेळ आहे, ती वेळ उद्या मुंबईवरही येईल. देशात ५० सहस्र काश्मीर सिद्ध झाले आहेत. तेथे प्रवेश करता येत नाही; कारण तिथून हिंदूंना हुसकावून लावण्यात आले आहे. यावरून तरी हिंदूंनी संघटनाचे गांभीर्य लक्षात घेऊन संघटित झाले पाहिजे.
  • देश आणि समाज म्हणजे काय ? या विचारधारेचा उद्देश काय आहे ?, हे हिंदु समाजाला सांगितले पाहिजे. हिंदूंच्या संघटनाच्या माध्यमातून देशभक्ती निर्माण करायची आहे. हिंदु विरोधकांना रोखण्यासाठी आंदोलन स्वरूपात संघटन वाढवले पाहिजे. माहिती अधिकार कायदा हे अत्यंत उपयुक्त शस्त्र आहे. यामध्ये केवळ १० रुपये व्यय करून आवश्यक ती माहिती प्राप्त करता येते. याचा उपयोग करण्यात कोणत्याही अडचणी येत नाहीत.
  • धर्मांध स्वतःची जनसंख्या वाढवणे, हिंदु समाजाला रोखणे, भूमींवर आक्रमण करणे, व्यापार कह्यात घेणे आदी गोष्टी करत आहेत. त्यामुळे हिंदु समाज घाबरत आहे. ही भीती दूर करण्यासाठीच हिंदूसंघटनाची नितांत आवश्यकता आहे.
  • आपण गोपूजा करतो. यासह गोरक्षणावर भाष्यही करतो आणि जे मंदिर तोडतात त्यांच्यासह व्यापार करतो. जो मंदिर तोडतो, त्याच्याकडून फुले घेऊन मंदिरात जातो, हे देवाला कसे आवडेल ?
  • जम्मू आणि काश्मीर राज्यात धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार केले आणि पडताळून पाहिले की, देशातील हिंदू आता काय प्रतिक्रिया देतात ? १ सहस्र ४०० मंदिरे तोडली गेली, तसेच आपले धर्म बांधव-भगिनी यांच्यावर अत्याचार झाले, तरी देशातील हिंदूंवर काहीही फरक पडत नाही. त्यामुळे या पडताळणीत इस्लाम जिंकला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *