मानोरी (नाशिक) : आपल्या जीवनात येणार्या अनेक समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती आणि उपाययोजना साधनेमुळे मिळते. गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास आपली जलद आध्यात्मिक उन्नती होते. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंच्या विविध धार्मिक उत्सवांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. हिंदु मुली धर्मशिक्षणाच्या अभावामुळे ‘लव्ह जिहाद’ला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत, हे चिंताजनक आहे. स्वरक्षण प्रशिक्षणाच्या अभावामुळे आज स्वत:चे रक्षण करण्यास हिंदू असमर्थ आहेत. यासाठी हिंदूंनी साधना करणे, धर्मशिक्षण घेणे आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिधर जोशी यांनी येथे भगवान शंकराच्या मंदिरात प्रदोष पूजेसाठी जमलेल्या भाविकांना नुकतेच केले. ५०० भाविकांनी याचा लाभ घेतला.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. तानाजी उगले आणि श्री. पंकज वाटपाडे यांनी स्वरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. ‘यापुढेही एका प्रदोष पूजेनंतर विषय मांडण्यासाठी पूर्ण वेळ उपलब्ध करून देऊ’, असे तेथील भाविकांनी उत्स्फूर्तपणे सांगितले. यासह ‘चांदवडजवळील सुतारखेडा या गावातील युवकांनी एक घंट्याचे प्रवचन घेऊन गावातील युवावर्गाला मार्गदर्शन करा’, अशी मागणी केली.