Menu Close

त्र्यंबकेश्‍वर येथील साधना तथा राष्ट्ररक्षा शिबिरातील मान्यवरांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक

१. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, २. श्री. सुनील घनवट आणि शिबिरामध्ये सहभागी झालेले विविध देशांतील प्रतिनिधी

त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक) : येथे पुरी पीठाधीश्‍वर श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली २० वे साधना तथा राष्ट्ररक्षा शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिरात देश-विदेशातील विविध संघटना आणि संस्था यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या साधना शिबिराला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट हेही उपस्थित होते. या वेळी देश-विदेशातील काही प्रतिनिधींनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक केले. तसेच समिती करत असलेल्या राष्ट्र-धर्म विषयक कार्यात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या ३ दिवसीय शिबिराच्या कालावधीमध्ये देश-विदेशातील विविध प्रतिनिधींची सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि श्री. सुनील घनवट यांच्याशी भेट झाली. श्री. सुनील घनवट यांनी सर्व प्रतिनिधींना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची माहिती दिली. तसेच सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी रामराज्य स्थापनेसाठी करावयाच्या प्रयत्नांविषयी मार्गदर्शन केले. जर्मनीसह विविध देशांचे प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, उत्तरप्रदेश आणि विविध राज्यांतील प्रतिनिधी शिबिरात उपस्थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *