‘अॅमेझॉन’ आस्थापनाचा हिंदुद्वेष कायम !
- सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अशा प्रकारे अवमान करणार्या आस्थापनांवर भाजप सरकारने कठोर कारवाई न केल्याचाच हा परिणाम आहे ! आतातरी सरकार याविरोधात कठोर भूमिका घेणार आहे का ?
- विदेशी आस्थापने कधी ख्रिस्ती किंवा मुसलमान यांच्या धार्मिक चिन्हांचा असा वापर करण्याचे धारिष्ट्य दाखवणार का ?
- जगात हिंदूंचे परिणामकारक हिंदूसंघटन झाले, तरच अशा प्रकारची धर्महानी टाळली जाईल, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हे चित्र छापले नसून हिंदूंना धर्महानी कळावी,
त्यासाठी हे चित्र प्रसिद्ध करत आहोत.
नेवाडा (अमेरिका) : जगातील सर्वांत मोठी ऑनलाइन विक्री करणार्या अमेरिकेतील ‘अॅमेझॉन’ आस्थापनाने भगवान शिवाची प्रतिमा असलेले कमोड आणि पायपोस यांची ‘ऑनलाइन’ विक्री चालू केल्यामुळे हिंदू संतप्त झाले आहेत. ‘आस्थापनाने या उत्पादनांची विक्री तात्काळ थांबवून हिंदूंची क्षमायाचना करावी’, अशी मागणी तेथील हिंदूंनी केली आहे. (विदेशात धर्महानी झाल्यावर जगभरातील हिंदू आवाज उठवतात. भारतातील जन्महिंदू यातून बोध घेतील का ? – संपादक)
अमेरिकेतील हिंदूंचे धार्मिक नेते राजन झेद यांनी अॅमेझॉन आस्थापनाचे अध्यक्ष जेफ्री बेझोस यांना पत्र पाठवून ‘भगवान शिवाच्या प्रतिमेचा स्वच्छतागृहात वापर केल्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. अॅमेझॉन आस्थापनाने याची नोंद घेऊन त्यांची संकेतस्थळावरून चालू असलेली विक्री थांबवावी आणि हिंदूंची जाहीर क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात