असे कितीही पुरावे दिले, तरी पाक त्याला भीक घालणार नाही. त्यामुळे ‘आतंकवाद्यांच्या निर्मितीचा कारखाना’ असलेल्या पाकचा निःपात करणे, हाच एकमेव उपाय होय !
नवी देहली : २६ फेब्रुवारी या दिवशी भारताच्या वायूदलाने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये जैश-ए-महंमदच्या प्रशिक्षण केंद्रावर केलेल्या कारवाईमध्ये १३० ते १७० जिहादी आतंकवादी ठार झाल्याचा दावा इटलीच्या महिला पत्रकार फ्रान्सेस्का मॅरिनो यांनी ‘इंडिया टिव्ही’ वृत्तवाहिनीशी बोलतांना केला.
मॅरिनो यांनी माहिती देतांना सांगितले की,
१. या कारवाईत ४५ आतंकवादी घायाळही झाले. त्यांच्यावर उपचार चालू असतांना त्यांतील २० जणांचा मृत्यू झाला. या कारवाईनंतर अद्यापही बालाकोटचा हा भाग बंद ठेवण्यात आला आहे. घायाळ झालेल्यांवर योग्य उपचारही केले जात नाहीत.
२. कारवाईनंतर पाकिस्तानी सैन्य तेथे पोचले. घायाळ आतंकवाद्यांना सैन्याने शिनकियारीमधील हरकत-उल-मुजाहिद्दीन या आतंकवादी संघटनेच्या शिबिरात भरती केले. त्यानंतर तेथे पाकिस्तानी सैन्याच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. ज्या लोकांवर उपचार करण्यात आले आहेत, ते अद्यापही पाकिस्तानी सैन्याच्या कह्यात आहेत. त्यांना अद्याप घरी सोडण्यात आलेले नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात