चीन त्याच्या देशात दंगली आणि जिहादी आतंकवादी कारवाया होऊ नयेत; म्हणून मुसलमानांवर कठोर निर्बंध घालतो, तर भारत ३ दशके जिहादी आतंकवाद आणि धर्मांधांचा उद्दामपणा रोखण्याऐवजी त्याकडे दुर्लक्षच करत आला आहे !
नवी देहली – चीनमध्ये रमझान मास चालू झाल्यावर येथील शिनजियांग या मुसलमानबहुल प्रांतामध्ये सरकारने विद्यार्थी आणि मुले यांना रोजा ठेवण्यावर बंदी घातली आहे. चीनच्या सरकारी संकेतस्थळावर या संदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत. चीनचा मित्र देश असणार्या पाकने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
१. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते या बंदीची कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. चीनचा दावा आहे की, सामाजिक स्थिरता कायम ठेवण्यासाठी असे करण्यात येत आहे.
२. ‘ह्युमन राईट्स वॉच (एचआरडब्लू )’च्या या आठवड्यात प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
३. संयुक्त राष्ट्रांच्या वांशिक भेदभाव निर्मूलन समितीने उघूर मुसलमानांसमवेत करण्यात येणार्या अशा व्यवहारावरून गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
४. ‘ह्युमन राईट्स वॉच’च्या अहवालात म्हटले आहे की, या मुसलमानांना ठेवण्यात आलेल्या शिबिरामध्ये सरकारी अधिकारी त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी आणि राजकीय विचारांविषयी जाणून घेतात. त्यानंतर त्यांचे राजकीय शुद्धीकरण केले जाते.
५. ह्युमन राईट्स वॉचच्या माया बँग यांनी सांगितले की, शिनजियांगमधील मुसलमानांवर करडी दृष्टी ठेवण्यात येते. ते काय खातात, कधी झोपतात याचीही माहिती ठेवण्यात येते.
६. संयुक्त राष्ट्रांच्या देखरेख गटांनी म्हटले आहे की, उघूर मुसलमानांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. विदेशातून परतणार्या उघूर मुसलमान विद्यार्थ्यांना गायब केले जात आहे, तर काहींना अटक केली जाते. अटकेत असतांना काही जणांचा मृत्यूही झाला आहे.
७. १० लाख मुसलमानांना शिबिरामध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच २० लाख मुसलमानांची राजकीय आणि सांस्कृतिक विचारसरणी पालटण्याचा प्रयत्न केला जात आहे.
८. या मुसलमानांना डुकराचे मांस खाण्यासाठी बळजोरी केली जाते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात