नांदेड : तेलंगण येथील अंबरपेट येथे अनधिकृत मशिदीच्या उभारणीस विरोध करण्यासाठी गेलेले प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना तेलंगण पोलिसांनी मोठा फौजफाटा बोलावून त्यांच्या समवेत अतिरेक्याप्रमाणे वर्तणूक करून त्यांना अटक केली. या निंदनीय कृत्याचा नांदेड येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी यांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना निवेदन देऊन निषेध केला. या प्रसंगी श्रीराम जन्मोत्सव समितीचे श्री. गणेश सिंह ठाकूर, शिवसेनेचे मिडिया प्रभारी श्री. गौतम जैन, अधिवक्ता शंकरसिंह ठाकूर, अधिवक्ता जगदीश हाके, बजरंग दलाचे श्री. अक्षय भोयर पाटील, धर्मप्रेमी श्री. गौरव वाळिंबे, योग वेदांत सेवा समितीचे श्री. शिवकैलास कुंटूरकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. वैभव आफळे आणि ३० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे केलेल्या काही मागण्या
१. तेलंगण पोलिसांनी आमदार टी. राजासिंह यांच्या समवेत केलेल्या अयोग्य पद्धतीच्या कारवाईसाठी संबंधित अधिकार्यांची चौकशी करून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई केली जावी.
२. अनधिकृत मशीद उभारणार्यांची चौकशी करावी आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी.
३. या घटनेचे समर्थन करणार्या घटनास्थळावरील उपस्थित सर्व धर्मांधांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अधिकाधिक शिक्षा व्हावी.