कुआलालंपूर (मलेशिया) : ‘मी दोषी ठरत नाही, तोपर्यंत मला अटक केली जाणार नाही’, असे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाने मला दिल्यासच मी भारतात परतण्यास सिद्ध आहे, अशा अटीवर जिहादी आतंकवाद्यांचा मार्गदर्शक डॉ. झाकीर नाईक याने भारतात येण्याची सिद्धता दर्शवली आहे. (भारताने झाकीर नाईक यांच्या अटींकडे लक्ष देण्याऐवजी त्यांना मलेशियातून अटक करून आणण्याची आवश्यकता आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
‘द वीक’ या साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत डॉ. झाकीर याने म्हटले आहे की, मला आजही भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी सरकारच्या विरोधात बोलू शकत होतो आणि न्याय मिळण्याचीही शक्यता ८० टक्क्यांपर्यंत होती; परंतु आज न्याय मिळण्याची शक्यता १० ते २० टक्केच आहे. इतिहासात पाहिले, तर आतंकवादी असल्याच्या आरोपांचा सामना करणार्या ९० टक्के लोकांना अधिकाधिक १० ते १५ वर्षांत त्यातून मुक्त करण्यात आले; परंतु मी भारतात परतल्यास न्यूनतम १० वर्षे तरी मला कारागृहात टाकण्यात येईल. त्यामुळे माझे काम बाधित होईल. अशा परिस्थितीत मी पुन्हा येण्याची चूक का करू ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात