Menu Close

मुंबई, नवी मुंबई आणि बोईसर येथे ‘मंदिर स्वच्छता’ उपक्रमाच्या माध्यमातून मंदिरांची स्वच्छता !

मुंबई, १२ मे (वार्ता.) – हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त मुंबई, नवी मुंबई आणि बोईसर (जिल्हा पालघर) येथे सनातन प्रभातचे वाचक, हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गातील महिला, सनातन संस्थेचे साधक आदींकडून मंदिरांची स्वच्छता करण्यात आली.

मुंबई

चेंबूर (पू) – रेल्वे स्थानकाजवळील देऊळवाडी येथील भूलिंगेश्‍वर मंदिर येथे ५ मे या दिवशी मंदिराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात धर्मप्रेमी आणि महिला सहभागी झाले होते.

मुलुंड (पू) – नानेपाडा येथील शिव-गणेश मंदिर येथे २ मे या दिवशी योगाभ्यास शिकवणीवर्गातील १६ धर्मप्रेमी महिलांनी या मंदिराच्या स्वच्छतेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वेळी मंदिराचे विश्‍वस्त श्री. मधुकर म्हात्रे आणि श्री. जनार्दन म्हात्रे यांचे सहकार्य लाभले.

वरळी – बीडीडी चाळ क्रमांक २१ येथील श्री साईनाथ मंदिर, जांभोरी मैदान येथे २ मे या दिवशी मंदिराची स्वच्छता करण्यात आली. या वेळी मंदिराचे विश्‍वस्त श्री. धरणे यांचे सहकार्य लाभले. येथे १४ जण सहभागी झाले होते. बीडीडी चाळ क्रमांक ७८ येथील विठ्ठल-रखुमाई मंदिराची २४ एप्रिलला स्वच्छता करण्यात आली. या वेळी सनातन प्रभातचे वाचक श्री. गजानन दुर्गुळे, तसेच मंदिराचे पुजारी यांनी विशेष सहकार्य केले. सनातन प्रभातच्या वाचक श्रीमती रत्ना वैराळ, जिज्ञासू सौ. प्रार्थना कांबळी, कु. दीक्षा कांबळी यांसह ५ जणांनी मंदिराची स्वच्छता केली.

काळाचौकी – आंबेवाडी येथील श्री खापरी बाबा मंदिराची २८ एप्रिल या दिवशी स्वच्छता करण्यात आली. सनातन प्रभातचे वाचक आणि मंदिराचे विश्‍वस्त देवीदास सोनावणे यांचे या वेळी उत्तम सहकार्य मिळाले. या वेळी सनातन प्रभातचे वाचक श्री. शशिकांत सांडव, श्री. राज धारगळकर, सौ. पद्मजा पवार, सौ. वनिता मांगले यांसह १५ जण स्वच्छतेत सहभागी होते.

सांताक्रूझ (पूर्व) – एअर इंडिया वसाहत, कलिना येथील सिद्धीविनायक मंदिरामध्ये २८ एप्रिलला स्वच्छता झाली. येथील पुजारी श्री. तांबेगुरुजी यांचे या वेळी चांगले सहकार्य लाभले. धर्मप्रेमी, सनातन प्रभातचे वाचक, तसेच सनातन संस्थेचे साधक यांनी मंदिर स्वच्छ केले. श्रीकृष्णनगर येथील श्रीकृष्ण मंदिरात ४ मे या दिवशी मंदिर स्वच्छता केली. यामध्ये सनातन प्रभातच्या वाचकांसह ३ जणांनी सहभाग घेतला.

भांडुप (प) – शिवमंदिर, सह्याद्रीनगर येथे २६ एप्रिल या दिवशी मंदिराची स्वच्छता केली. हा उपक्रम येथे राबवण्यासाठी २ धर्मप्रेमींची, तसेच सनातन प्रभातच्या वाचक सौ. प्राची बापर्डेकर यांची पुष्कळ तळमळ होती. येथे ६ जणांनी मंदिर स्वच्छ केले.

भांडुप (पू) – दत्तमंदिर, अशोकनगर येथे २५ एप्रिलला सनातन प्रभातचे वाचक, धर्मप्रेमी आणि सनातन संस्थेचे साधक यांसह ९ जणांनी मंदिराची स्वच्छता केली.

नवी मुंबई

ऐरोली – सेक्टर ३ येथील श्री रामेश्‍वर महादेव मंदिराची १७ एप्रिलला स्वच्छता केली. या वेळी प्रथम स्वच्छतेचा उद्देश सांगण्यात आला. या सेवेचे नियोजन धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या सौ. स्वाती साळुंखे, सौ. संगीता घाडगे, सौ. रसिका खानविलकर, सौ. भांडुगळे या धर्माभिमानी महिला, तसेच धर्मप्रेमी श्री. ओंकार घाडगे यांनी केले. यांसह ८ जणांनी मंदिर स्वच्छ केले. मंदिराचे विश्‍वस्त श्री. मदनलाल चौधरी यांचे या वेळी मोलाचे सहकार्य लाभले.

सेक्टर ३ च्या श्री सप्तश्रृंगी मंदिराची २२ एप्रिल या दिवशी स्वच्छता झाली. यामध्ये सनातन प्रभातचे वाचक सौ. सोनावणे आणि सौ. तिवारी यांसह धर्मशिक्षणवर्गातील सौ. स्वाती दगडे, कु. दर्शना साळुंखे सहभागी झाल्या होत्या. सनातन संस्थेच्या साधकांसह वरील सर्व जण सहभागी झाले.

खारघर – सेक्टर १२ येथील शिवमंदिर येथे २५ एप्रिलला सनातन संस्थेच्या सौ. संगीता शेलार यांनी मंदिर स्वच्छतेविषयी माहिती सांगितली. येथे धर्मशिक्षणवर्गातील महिलांसह ६ जण स्वच्छतेत सहभागी झाले होते.

पालघर

बोईसर – एम्एस्सीबी वसाहतीतील हनुमान मंदिरामध्ये २३ एप्रिलला मंदिर स्वच्छतेचा उद्देश, त्याचे परिणाम सांगून मंदिराची स्वच्छता करण्यात आली. या वेळी मंदिराचे कार्य पहाणार्‍या सौ. लता शेवाळे, यांसह अन्य महिलाही सहभागी झाल्या.

नवापूर रोड येथील श्रीराम मंदिराची २४ एप्रिलला स्वच्छता करण्यात आली. मंदिराचे अध्यक्ष श्री. बच्चन शुक्ला आणि पुजारी श्री. योगेश उपाध्याय यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले. येथे २ धर्मप्रेमींसह ५ जणांनी मंदिर स्वच्छ केले.

पास्थळ येथील साईबाबा मंदिरामध्ये २५ एप्रिलला मंदिर स्वच्छता करण्यात आली. या वेळी फूल विकणार्‍या श्रीमती मीनाक्षी वडे या धर्मप्रेमी महिलेसह, धर्मशिक्षणवर्गातील महिला, सनातन संस्थेचे साधक आणि अन्य ४ जण सहभागी झाले होते.

कारंजा : स्वच्छतेसमवेत ‘साधना आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर प्रवचन

कारंजा (जिल्हा वाशिम) : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवलेे यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आणि श्री बसवेश्‍वर जयंतीचे औचित्य साधून  ७ मे या दिवशी येथील श्री वनवेश्‍वर देवस्थान येथे मंदिर स्वच्छतेसमवेत ‘साधना आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर श्री. संतोष परसवार यांनी प्रवचन घेतले. याचा लाभ ५० भाविकांनी घेतला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *