Menu Close

श्रीलंकेत ३ मशिदी आणि मुसलमानांची दुकाने यांची तोडफोड

फेसबूकवर धर्मांधांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे प्रकरण

एक जिहादी आक्रमण झाल्यावर श्रीलंकेत ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ अशी पोपटपंची करण्यात आली नाही. याउलट थेट धर्मांधांना धडा शिकवण्यासाठी जनता कायदा हातात घेऊन पुन्हा आतंकवाद्यांना आक्रमण करण्याचे धाडस होणार नाही, अशी स्थिती निर्माण करत आहे, हे लक्षात घ्यायला हवे !

कोलंबो : श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटांनंतर मुसलमानांवर आणि मशिदींवर ख्रिस्त्यांकडून आक्रमणे चालूच आहेत. चिलाऊ या ख्रिस्तीबहुल शहरात एका धर्मांधाने लिहिलेल्या आक्षेपार्ह फेसबूक ‘पोस्ट’नंतर स्थानिकांनी ३ मशिदींवर आक्रमण केले, तसेच मुसलमानांच्या दुकानांची तोडफोड केली. (जगात कुठेही धर्मांध त्यांची धर्मांधता सोडत नाहीत आणि ते सतत चिथावणीखोर कृत्येच करत असतात, हेच यातून दिसून येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या हिंसाचारानंतर श्रीलंका सरकारने फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप आणि अन्य सामाजिक माध्यमे यांवर तात्पुरती बंदी घातली आहे. तसेच अतीसंवेदनशील ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

१. श्रीलंकेच्या पोलिसांचे प्रवक्ते रुवान गुणशेखर यांनी सांगितले की, फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणार्‍या हमीद महंमद हसमार या ३८ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यापूर्वी ख्रिस्त्यांकडून त्याला बेदम चोपण्यात आले.

२. या पोस्टमध्ये लिहिण्यात आले होते, ‘आम्हाला कोणीही रडवू शकत नाही.’ त्यावर अन्य एका धर्मांधाने प्रतिक्रिया व्यक्त करतांना,  ‘अधिक हसू नका, तुमच्यावर रडण्याची पाळी येईल’, असे लिहिले. या उत्तराला सामाजिक माध्यमातून धमकी मानले गेले. त्यावरून वाद झाला आणि त्याचे पर्यवसान आक्रमण करण्यात झाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *