परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’
मुंबई : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात राबवण्यात येत असलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत मुंबई आणि नवी मुंबई या भागांत ठिकठिकाणी प्रवचने अन् अभ्यासवर्ग घेण्यात आले. यामध्ये ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘साधना’, ‘हिंदु राष्ट्र’, ‘अभ्यास कसा करावा’ आदी विषयांच्या माध्यमातून ‘मनुष्य जीवनातील अध्यात्माचे महत्त्व’ सांगण्यात आले. या उपक्रमाला ठिकठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळाला. समाजातील शेकडो जिज्ञासूंनी याचा लाभ घेतला.
मुंबई
परळ : येथील श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये २० एप्रिल या दिवशी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन झाले.
प्रभादेवी : येथील अहुजा इमारत क्रमांक २ येथे ‘आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर १ मे या दिवशी श्री. राहुल पाटेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी प्रवचनाला १७ जिज्ञासू उपस्थित होते.
सांताक्रूझ : येथील सनातन प्रभातच्या वाचक सौ. सुनंदा मांजरेकर यांच्या निवासस्थानी, तसेच खांडवाला कॉम्प्लेक्स आणि पारकर चाळ या ठिकाणी ‘साधना’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.
भांडुप : २७ एप्रिल या दिवशी येथील सर्वोदयनगरमधील गावदेवी टेकडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. प्राजक्ता सावंत यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ १६ महिलांनी घेतला. तसेच कोकणनगर येथील सनातन प्रभातच्या वाचक सौ. प्राची बापर्डेकर यांच्या घरी २६ एप्रिल या दिवशी ‘साधना’ आणि ‘अक्षय्य तृतीयेचे महत्व’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले.
मुलुंड : येथील पूर्व भागातील सुगंधा सोसायटी, तसेच पश्चिम भागातील सागर वैभव सोसायटी येथे ‘साधना’ या विषयावर घेण्यात आलेल्या मार्गदर्शनाचा लाभ बहुसंख्य जिज्ञासूंनी घेतला.
पवई : पवई विहार संकुल येथील शिवमंदिर येथे सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी ‘आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ येथील सनातन प्रभातचे वाचक आणि जिज्ञासू यांनी घेतला.
नवी मुंबई
नेरूळ : येथील सेक्टर १० मधील ‘शांताश्री क्लासेस’ या शिकवणीवर्गात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. स्नेहा हरमळकर यांनी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन केले. याचा लाभ २० विद्यार्थ्यांनी घेतला.
ऐरोली : येथील ‘शहा क्लासेस’मधील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना हिंदु जनजागृती समितीच्या सौ. स्नेहा हरमळकर आणि इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) ममता देसाई यांनी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन केले. दोन्ही इयत्तांमधील १५० विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शचा लाभ घेतला.
कोपरखैरणे : येथील सेक्टर ६ मधील ‘ओम साई दत्त क्लासेस’ या शिकवणीवर्गातील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सनातनच्या साधिका सौ. स्नेहा हरमळकर यांनी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन केले. याचा लाभ ३६ विद्यार्थ्यांनी घेतला. सेक्टर ७ मधील ‘अॅम्बिशन क्लासेस’ येथे ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर करण्यात आलेल्या मार्गदर्शनाचा लाभ इयत्ता १० वीच्या १९ विद्यार्थ्यांनी घेतला.
शिकवणीवर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
मुंबई आणि नवी मुंबई येथील विविध शिकवणीवर्गांतील विद्यार्थ्यांना ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’, तसेच ‘अभ्यास कसा करावा’ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
घोडपदेव (भायखळा) : येथील ‘व्हिजन अॅकॅडमी’ या शिकवणीवर्गात विद्यार्थ्यांसाठी २५ एप्रिलला ‘अभ्यास कसा करावा ?’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सनातन संस्थेच्या सौ. ज्योती परब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी दहावी आणि बारावीचे ८० विद्यार्थी उपस्थित होते.