Menu Close

वल्लभगड (हरियाणा) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

vallabgad_photo_clr
वल्लभगड येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करतांना धर्माभिमानी हिंदू

वल्लभगड (हरियाणा) : इशरतजहाँ ही लष्कर-ए-तोयबा या संघटनेची आतंकवादी असल्याचे लपवणारे तत्कालीन काँग्रेस शासनातील केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाई करण्यात यावी, भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्याविषयी विकृत लिखाण करणारे डॉ. यरल्लगदा लक्ष्मीप्रसाद यांना घोषित झालेला पद्मभूषण पुरस्कार रहित करावा, काश्मीरमध्ये ज्या मशिदींवरून देशविरोधी आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येतात, त्या मशिदींवरील, तसेच देशातील अन्य मशिदींवरील अनधिकृत भोंगे कायमस्वरूपी काढून टाकण्यात यावे, आदी मागण्यांसाठी २० मार्च या दिवशी येथील आंबेडकर चौकातील सिटी पार्कमध्ये राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये गोमानव सेवा समिती, राजीव दीक्षित स्वदेश मंच, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यासह हिंदु धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला.

हिंदूंच्या मागण्या !

१. माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाई करण्यात यावी !
२. डॉ. यरल्लगदा लक्ष्मीप्रसाद यांना घोषित झालेला पद्मभूषण पुरस्कार रहित करावा !
३. मशिदींवरील अनधिकृत भोंगे कायमस्वरूपी काढून टाकण्यात यावे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *