Menu Close

मुंबई, नवी मुंबई, तसेच पालघर येथील मंदिरांत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठांचे साकडे !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सहभाग !

परात्पर गुरु डॉ. आठवले

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत मुंबई, नवी मुंबई आणि पालघर येथील विविध मंदिरांत साकडे घालण्यात आले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घारोग्य लाभावे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेत येणारे अडथळे दूर व्हावेत’ यांसाठी हिंदुत्वनिष्ठांनी साकडे घातले.

नवी मुंबई

कोपरखैरणे : वरदविनायक मंदिर येथे साकडे घालतांना धर्मप्रेमी

कोपरखैरणे : सेक्टर ६ येथील दत्त मंदिरात ९ मे या दिवशी साकडे घालण्यात आले. येथे १५ जण उपस्थित होते. सेक्टर ३ च्या हनुमान मंदिरात ६ मे या दिवशी साकडे घातले. येथे सनातन प्रभातच्या ४ वाचकांसह २१ जण सहभागी झाले होते. सेक्टर ४ च्या वरदविनायक मंदिर येथे मंदिरातील एका भक्ताने ३० एप्रिलला साकडे घातले. धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी महिलांसह १५ जण उपस्थित राहिले. सनातन प्रभातच्या वाचक सौ. अंजना धनावडे यांनी प्रसाद अर्पण केला.

सानपाडा : सेक्टर ३ च्या हनुमान मंदिरात ४ मे या दिवशी साकडे घातले. येथे श्री. गोस्वामी यांनी श्रीफळ वाढवले. या वेळी १३ जण उपस्थित होते. सेक्टर ८ मधील रिद्धी-सिद्धी गणेश मंदिर येथे ६ मे या दिवशी साकडे घालण्यात आले. येथे सनातन प्रभातचे वाचक श्री. लक्ष्मण उरसळ यांनी श्रीफळ वाढवले. येथे मंदिराच्या पुजार्‍यांसह १४ जण सहभागी झाले होते. दोन्ही ठिकाणी सनातन संस्थेच्या साधिका सौ. कमल गिरमकर यांनी साकडे घातले.

ऐरोली : सेक्टर ८ येथील श्री साईबाबा मंदिर येथे २९ एप्रिलला मंदिराचे पुजारी श्री. वैद्यगुरुजी यांनी साकडे घातले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. समाधान साळुंखे यांनी श्रीफळ वाढवले. ते साकड्याचा उद्देश सांगत असतांना श्री. वैद्यगुरुजी लक्षपूर्वक ऐकत होते. या वेळी सनातन प्रभातच्या २ वाचकांसह १६ जण उपस्थित होते.

खारघर : सेक्टर १२ मधील शिवमंदिरात येथे २४ एप्रिलला साकडे घालण्यात आले. या वेळी मंदिराचे पुजारी, सनातन प्रभातचे वाचक, धर्मशिक्षणवर्गातील महिला यांसह २३ जण उपस्थित होते.

मुंबई

वांद्रे (पू) : शासकीय वसाहतीतील श्री गजानन महाराज मंदिर येथे ९ मे या दिवशी सनातनच्या साधिका श्रीमती वैभवी नाईक यांनी साकडे घातले. या वेळी मंदिराचे विश्‍वस्त श्री. आणि सौ. देशपांडे यांच्यासह १५ जण उपस्थित होते.

सांताक्रूझ (पू) : दत्त मंदिर येथे साकडे घालतांना भाविक

सांताक्रूझ (पू) : वाकोला येथील श्रीकृष्णनगर येथील श्रीकृष्ण मंदिरात धर्मप्रेमी श्री. मयूर धुमाळ यांनी ४ मे या दिवशी साकडे घातले. या प्रसंगी येथे १५ जण उपस्थित होते. वाकोला येथील साईबाबा मंदिरात पुजारी श्री. धर्मेश दुबे यांनी ४ मे या दिवशी साकड्याचे वाचन केले. या वेळी २५ जण सहभागी होते. वाकोला येथील श्री दत्त मंदिर येथे ३० एप्रिलला मंदिराचे पुजारी श्री. सतीश बुलवाडीया यांनी साकडे घातले. या वेळी ६५ जण उपस्थित होते. कलिना येथील सुंदरनगरमधील राममंदिरात २७ एप्रिलला भजनी मंडळाच्या सौ. कदम यांनी साकड्याचे वाचन केले. येथे २१ जण सहभागी झाले होते.

चेंबूर (पू) : भूलिंगेश्‍वर मंदिरात साकडे घालण्यात आले.

प्रभादेवी : हनुमान मंदिर येथे साकडे घालतांना हिंदुत्वनिष्ठ

प्रभादेवी : श्री विनायकनगर रहिवासी संघ, प्रभादेवी को-ऑप हौ. सोसायटी येथील हनुमान सेवा मंडळात ४ मे या दिवशी सौ. मेघना सागवेकर यांनी साकडे घातले. धर्मप्रेमी श्री. बाळकृष्ण कुंदरकर यांनी श्रीफळ वाढवले. मंदिराचे सचिव श्री. श्रीनिवास बिंगी यांनी मंदिरात आध्यात्मिक कार्यक्रम घेण्यास, तसेच प्रत्येक आठवड्याला सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यास अनुमती दिली.

कुर्ला (पू) : कामगारनगर येथील नंदकिशोर मंदिर आणि नेहरूनगर येथील हरेश्‍वर मंदिर येथे साकडे घालण्यात आले.

पवई : पवारवाडी येथील दुर्वाप्रिय गणेश मंदिरात समितीचे श्री. प्रसाद कदम यांनी साकडे घातले. सनातन प्रभातचे वाचक श्री. शाम नाग यांनी श्रीफळ वाढवले. या वेळी ५० जण उपस्थित होते.

मुलुंड (प) : येथील जय श्री संतोषीमाता मंदिरात ३० एप्रिलला साकडे घातले. येथे १० धर्मप्रेमी महिलांसह २४ जण सहभागी झाले.

परळ : चमारबागवाला लेन येथील श्री महालक्ष्मी मंदिर येथे २७ एप्रिल या दिवशी साकड्याचे वाचन करण्यात आले. सनातन प्रभातच्या वाचक सौ. विनती राऊत यांनी देवीची ओटी भरली. या वेळी पुजारी श्री. सुभाष वाईरकर यांच्यासह १७ जण उपस्थित होते.

काळाचौकी : आंबेवाडी येथील खापरीबाबा देवस्थान येथे २८ एप्रिलला समितीचे श्री. प्रसाद मानकर यांनी साकड्याचे वाचन केले. मंदिराचे विश्‍वस्त श्री. देवीदास सोनावणे यांनी श्रीफळ वाढवले. या वेळी सनातन संस्थेच्या साधकांसह १८ जण उपस्थित होते.

वरळी : बीडीडी चाळ क्रमांक २१ येथील श्री साईनाथ मंदिर, जांभोरी मैदान येथे २ मे या दिवशी साकड्याचे वाचन झाले. मंदिराचे विश्‍वस्त श्री. धरणे यांनी श्रीफळ वाढवले. त्यांनी सनातच्या साधकांना मंदिरात प्रवचन आणि सत्संग घेण्याची विनंती केली. या वेळी सनातन प्रभातच्या ४ वाचकांसह ४० जण सहभागी झाले होते. वरळी पोलीस कॅम्प येथील श्री साईनाथ मंदिरात ९ मे या दिवशी साकडे घातले. हितचिंतक श्री. दशरथ सावंत यांनी श्रीफळ अर्पण केले. मंदिराचे अध्यक्ष श्री. शैलेश मोरे यांच्यासह २५ जण उपस्थित राहिले.

पालघर

नालासोपारा : स्वामी श्रद्धानंद आश्रम येथे साकडे घालतांना भक्त

नालासोपारा (प) : निर्मल गाव येथील स्वामी श्रद्धानंद आश्रम येथे ७ मे या दिवशी पुरोहित विजय जोशी यांनी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या देवींना साकडे घातले. या वेळी २५ जण उपस्थित होते.

डहाणू : मसोली नाका पश्‍चिम येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंडित चव्हाण यांनी ५ मे या दिवशी साकड्याचे वाचन केले. या वेळी मंदिराचे विश्‍वस्त श्री. अरुण पाठक, माजी नगरसेविका सौ. आशा पाठक, सनातन प्रभातचे २ वाचक यांसह १७ जण उपस्थित होते.

ठाणे

भाईंदर : येथील पोलीस ठाण्याजवळील श्री गणेश मंदिर येथे ७ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रथमेश कुडव यांनी साकडे घातले. मंदिराचे पुजारी श्री. दत्तात्रय भट यांचे सहकार्य लाभले. यामध्ये ४० जण सहभागी झाले होते.

साकडे घालतांना विविध ठिकाणी आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव म्हणजे दैवी नियोजनाची प्रचीतीच !

शिव-गणेश मंदिरात साकडे घालतांना मंदिर विश्‍वस्तांसह ५०० भाविकांची उपस्थिती !

नेरूळ : हनुमान मंदिर येथे साकडे घालतांना धर्मप्रेमी

नेरूळ : सेक्टर १, शिरवणे येथील हनुमान मंदिर येथे ४ मे या दिवशी सनातन संस्थेच्या साधिका सौ. प्रविणा पाटील यांनी साकड्याचे वाचन केले. श्री. अनंत सातपुते यांनी श्रीफळ वाढवले. सनातन प्रभातच्या २ वाचकांसह ३० जण सहभागी झाले. सेक्टर १२, सारसोळे येथील शिव-गणेश मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश सनील यांनी राममंदिराविषयी साकड्याचे वाचन केले. या वेळी ५०० भाविकांसह मंदिराचे विश्‍वस्तही उपस्थित होते.

धर्मकार्यात सहभागी करून घेतल्यासाठी धर्मप्रेमींकडून आभार व्यक्त !

बोईसर : नवश्या मारुति मंदिर येथे साकडे घालतांना हिंदुत्वनिष्ठ

बोईसर – विजय कॉलनी येथील नवश्या मारुति मंदिर येथे ४ मे या दिवशी सनातन संस्थेचे साधक श्री. जयप्रकाश पाटील यांनी साकडे घातले. साकडे घालण्याचा उद्देश धर्मप्रेमी लक्षपूर्वक ऐकत होते. साकडे घातल्यानंतर एक धर्मप्रेमी म्हणाले, ‘‘तुम्ही आज या मंदिरात साकडे घालण्यासाठी आला नसतात, तर आम्हाला या धर्मकार्यात सहभागी होता आले नसते. आम्हाला सहभागी करून घेतले म्हणून आम्ही मारुतिरायाचे आणि सनातन संस्थेचे आभारी आहोत.’’ या वेळी १५ धर्मप्रेमींसह १७ जण उपस्थित होते.

साकडे घालतांना शिवपिंडीवरील फूल पडल्याने श्री सिद्धेश्‍वराच्या आशीर्वादाची आलेली प्रचीती !

फेरबंदर (भायखळा) – रामभाऊ भोगले मार्गावरील सिद्धेश्‍वर मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. संदीप शिंगाडे यांनी २ मे या दिवशी साकडे वाचले. मंदिराच्या व्यवस्थापक सौ. रश्मी भिंगार्डे यांनी याच मंदिरातील देवीची ओटी भरली. त्यांनी महिलांना मंदिरात ‘गाऊन’ घालून येण्यास बंदी घातली आहे. साकडे वाचनाच्या दिवशी प्रदोष काळ होता. या दिवशी शिवाची उपासना केली जाते. याच दिवशी साकडे घालत असतांना शिवपिंडीवरील फूल पडले. त्यावर सौ. भिंगार्डे म्हणाल्या, ‘‘सिद्धेश्‍वराने तुमच्या कार्याला आशीर्वाद दिला आहे.’’  येथे २७ जण उपस्थित होते.

साकडे घालण्याच्या पुढील उपक्रमात सहभागी होण्याचे पुजार्‍यांचे आश्‍वासन !

मुलुंड (पू) – नवघर रोड येथील पंचमुखी शिवमंदिर येथे २९ एप्रिलला साकड्याचे वाचन झाले. सनातन प्रभातचे वाचक श्री. श्रीकृष्ण जोशी यांनी साकडे वाचले, तर सनातन संस्थेचे श्री. राजेंद्र भोगले यांनी यामागील उद्देश सांगितला. मंदिरात शिवपिंडीवर अभिषेक करण्यासाठी आलेल्या एका पुजार्‍यांनी हा विषय ऐकल्यावर सांगितले, ‘‘तुम्ही पुन्हा कुठे साकडे घालणार असाल, तिथे मला बोलवा, मी नक्की येईन.’’ धर्मप्रेमी श्रीमती रेखा वराडी यांनी श्रीफळ वाढवले. या वेळी धर्मप्रेमी ११ महिलांसह १५ जण उपस्थित होते. आर्पीएफ् येथील श्री गणेश मंदिरात ७ मे या दिवशी साकडे घालण्यात आले. या वेळी मंदिराचे विश्‍वस्त श्री. रवींद्र भोईर यांच्यासह २१ जण उपस्थित होते.

साकड्यासाठी केलेल्या आवाहनानंतर भाविकांचा सहभाग !

चुनाभट्टी (पू) – एन् पुरव मार्ग येथील साई मंदिर येथे सनातनचे श्री. चंद्रकांत भदिर्के यांनी २ मे या दिवशी साकडे वाचले. पुरोहित श्री. चेतन गोडबोले यांनी श्रीफळ वाढवले. ‘हिंदु राष्ट्रासाठी साकडे घालण्यात येणार आहे, त्यात आपणही सहभागी होऊया’, असे मंदिरात येणार्‍या भाविकांना सांगितल्यावर ते लगेच सहभागी झाले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद टोणपे, साई मंदिराचे श्री. संजय पाटील यांसह २५ जण सहभागी झाले होते.

येथील शनैश्‍वर मंदिरात ७ मे या दिवशी मंदिराचे पुजारी श्री. जगदीशकुमार यांनी प्रार्थना केली. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना साकडे घालण्यासाठी थांबण्यास सांगितल्यावर ते हात जोडून थांबले, तसेच कुणीही घाई केली नाही. या ठिकाणी २५ जण सहभागी झाले होते.

सत्संगाच्या आयोजकांकडून सनातनच्या कार्याचे कौतुक !

विलेपार्ले (पू) – रमाबाई परांजपे सभागृहात भगवान दत्तात्रय सत्संग मंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्संगात ५ मे या दिवशी वेदपाठशाळेचे वेदमूर्ती श्री. गोविंदशास्त्री जोशी यांनी साकड्याचे वाचन केले. आयोजक श्री. महेश बापट यांनी या वेळी सांगितले, ‘‘सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे.’’  येथे सनातन प्रभातच्या वाचकांसह ५७ भाविक सहभागी झाले होते.

हिंदु राष्ट्र येणार असल्याची धर्मप्रेमींना निश्‍चिती !

बोरीवली (पू) – काजूपाडा येथील बद्रीकेदारनाथ मंदिर येथे २४ एप्रिल या दिवशी साकडे घालण्यात आले. सनातन संस्थेच्या कु. शिवानी किर यांनी साकड्याचा उद्देश आणि महत्त्व सांगितले, तर हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमित पडियार यांनी साकड्याचे वाचन केले. उपस्थित धर्मप्रेमींनी ‘आता हिंदु राष्ट्र येणारच’ याविषयी निश्‍चिती वाटत असल्याचे सांगितले. या वेळी १६ जण उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *