न्यूयॉर्क : अमेरिकेतील कॅलिफोर्निया शिक्षण मंडळाने इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून भारताचे इंडिया हे नाव वगळून साऊथ एशिया (दक्षिण आशिया) असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील काही प्राध्यापकांच्या मते १९४७ च्या आधी इंडिया अस्तित्वात नव्हता. त्यामुळे वरील निर्णय घेण्यात आला. तसेच या पाठ्यपुस्तकातून हिंदु धर्माचे हिन्दुइझम हे नाव काढून केवळ भारतातील महिला आणि मागासवर्गीय यांना मिळणार्या वागणुकींचा ऐकीव उल्लेख केला आहे.
या विरोधात ग्लोबल हिंदू हेरीटेज फाऊंडेशनच्या वतीने डॉ. वामसी जुलुरी यांनी स्वाक्षर्यांची चळवळ प्रारंभ केली असून भारताच्या विदेश व्यवहार विभागाने याविषयी शासन स्तरावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत या चळवळीत ३ सहस्र हिंदूंनी स्वाक्षर्या केल्या आहेत. अद्याप किमान २ सहस्र स्वाक्षर्या आवश्यक आहेत, असे डॉ. जुलुरी यांनी कळवले आहे.
धर्माभिमान्यांनी या चळवळीत अधिकाधिक स्वाक्षर्या करण्याचे आवाहन हिंदूंना केले आहे. ही चळवळ पुढील मार्गिकेवरून चालू आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात