ठाणे : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत मंदिर स्वच्छता उपक्रम, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत’ यासाठी देवाला साकडे घालणे, तसेच ‘साधना’ या विषयावरील प्रवचने असे विविध उपक्रम ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ आणि कल्याण येथे आयोजित करण्यात आले.
ठाणे, डोंबिवली आणि कल्याण येथील मंदिरांमध्ये साकडे घातले !
ठाणे (प) : या ठिकाणी वसंत विहार येथील हनुमान मंदिर, ज्ञानेश्वरनगर येथील श्री हनुमान मंदिर; डोंबिवली (पू) येथे लोढा हेवन येथील हनुमान मंदिर, दुर्गा-परमेश्वरी मंदिर; डोंबिवली (प) मध्ये गरिबांचा वाडा येथील शिवमंदिर; कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि टिळक चौक येथील महालक्ष्मी मंदिर मंदिरस्वच्छता आणि साकडे घालणे उपक्रम
डोंबिवली (प) : दत्त मंदिर; ठाणे पश्चिमेत वर्तकनगर येथीलश्री पंचपरमेश्वर मंदिर, सावरकरनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, श्री साईबाबा मंदिर, तसेच लोकमान्यनगर येथील श्री महाकाली मंदिर
‘साधना’ या विषयावर प्रवचने !
हिंदु जनजागृती समितीच्या वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे यांनी कल्याण (प) येथील मातोश्री जमनाबेन विद्यालयात उपस्थितांना ‘साधना’ या विषयावर मार्गदर्शन केले. वर्तकनगर येथील साईनाथ सोसायटी, तसेच भिवंडीतील वडूघर येथे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. कल्याण येथील धर्माभिमानी वाचक श्री. भारंबे यांच्या कार्यालयात, तसेच घरी अनुक्रमे श्री. माधव साठे आणि वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे यांनी विषय मांडला. ठाणे (प) येथे वागळे इस्टेटमधील शिवसेना शाखेत, तसेच शहापूर येथे समितीचे कार्यकर्ते श्री. प्रशांत सुर्वे यांनी, तर डोंबिवली (पू) येथील सनातनचे साधक श्री. अजय संभूस यांच्या निवासस्थानी ‘साधना’ विषयावरील प्रवचन घेतले. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. मनीषा क्षीरसागर यांनी ठाण्यात वागळे इस्टेटमधील शिवसेना शाखा आणि पाचपाखाडी येथील धरणीमाता मित्र मंडळ येथे ‘साधना’ या विषयावर मार्गदर्शन केले.
सहभाग आणि प्रतिसाद
- लोढा हेवन येथील हनुमान मंदिरामधील भाविक आणि धर्मप्रेमी यांनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांनी समितीच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. श्री. केशव वाळके यांनी भाविकांकडून श्रीरामाचा जप ५ मिनिटे करून घेतला.
- डोंबिवली (प) येथील दत्त मंदिरात धर्माभिमानी श्री. राजेंद्र पुजारी यांनी भक्तांना ‘सनातन’ या शब्दाचा अर्थ, तसेच शास्त्रानुसार पूजा कशी करावी यांविषयी माहिती सांगितली.
- वागळे इस्टेट (ठाणे) येथील श्री पंचपरमेश्वर मंदिरात साकडे घालून झाल्यानंतर चार धर्मप्रेमींनी थांबून समितीचे कार्य समजून घेतले.
- कल्याण येथे सौ. भारंबे यांनी स्वतः कापडी फलक लावणे, ग्रंथ मांडून ठेवणे, गुरुकृपायोगाविषयीची माहिती सांगता येण्यासाठी साहित्याची सिद्धता करणे अशी प्रवचनाची सिद्धता करून ठेवली होती.
- ‘सनातन प्रभात’च्या वाचक सौ. बाऊसकर यांनी नामजप करत मानेच्या बिंदूदाबन उपचारांचे प्रात्यक्षिक साधकांना दाखवले.